▪️जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय चामोर्शी येथे २ आक्टोंबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी माता सरस्वती, महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण दीप व प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या मीना गद्देवार होत्या प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंदाताई वानखेडे, माजी अध्यक्ष सुधीरजी गडपायले, चंद्रशेखर आदी उपस्थित होते
विद्यार्थ्यांनी गांधीजीच्या सत्य, अहिंसा व स्वच्छतेच्या विचारावर आधारित प्रभावी भाषणे सादर करून लालबहादुर शास्त्री यांचा जय जवान जय किसान हा नारा दिला व त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकता आणि देशभक्ती यावर प्रकाश टाकणारे वचने मांडली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने वातावरण भारावून गेले. तसेच गांधीजींच्या स्वातंत्र लढ्यातील योगदान व लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वगुणावर आधारित नाटिका सादर करून विद्यार्थ्यांनी सर्वांची मने जिंकली.कार्यक्रमाला उपस्थित कु. हर्षा रदये, कु. संगीता मोटघरे, कु. पद्मा शिवरकर, कु. चाटे मॅडम, जगदीश देशमुख, नेत्रा पोटवार, सौ. हिनालता मंडल दिलीप कुनघाडकर इत्यादी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. संगीता मोटघरे यांनी केले. प्रस्ताविक जगदीश देशमुख, आभार प्रदर्शन कु अक्षरा मडावी यांनी केले



