आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मकर संक्रांतीच्या सणावर महागाईचं सावट, तिळाच्या दरात ४० रुपयांची वाढ..

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई (इंडिया 24 न्यूज )मकर संक्रांतीचा सण तोंडावर आला असून नाशिक शहरातील एका कारखान्यात तिळगुळ बनवण्याची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे दरवर्षीच्या तुलनेत तिळाचे भाव चाळीस रुपये वाढल्यामुळे यंदा तिळगुळ देखील तिखट झाला आहे.

मकर संक्रात म्हटली की प्रत्येक घराघरात तिळगुळ हा बनवला जातो. मात्र हल्लीच्या धावपळीच्या युगात अनेकजण हे रेडिमेड तिळगुळाला पसंती देतात. अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांत आली असून यांना मोठ्या उत्साहात या सणाची तयारी सुरू आहे. मकर संक्रांतीला तिळगुळाचे वाटप केलं जातं. आणि याच तिळगुळ बनवण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र तिळाचे दर वाढल्यामुळे तिळगुळाच्या लाडूतही 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिळाच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 40 रुपयांनी वाढ झाली असून तिळीने 200 चा आकडा पार केला असून 210 रुपये किलोवर ति जाऊन पोहोचली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.