आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सकाळच्या टॉप घडामोडी : 12 जानेवारी 2023

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

इंडिया 24 न्यूज

▪️राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये 40 हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश.

▪️मंत्रिमंडळ बैठकीत भाजप – शिंदे गटात खडाजंगी: विधान परिषद जागावाटप अन् देवेन भारती यांच्या नियुक्तीवरून वाजले.

▪️हसन मुश्रीफांचा खुलासा: म्हणाले – भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या कारखान्यांशी माझा संबंधच नाही; कुटुंबाला त्रास देणे अयोग्य.

▪️नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार.

▪️आमदार बच्चू कडू यांचा अपघात: डोक्याला 4 टाके पडले, पायालाही गंभीर दुखापत; अमरावतीत रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक.

▪️देवेंद्र फडणवीस हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री असून महाराष्ट्राच विकास देवेंद्र फडणवीसच करू शकतात, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलं.

▪️मागचे सरकार फेसबूकवर लाईव्ह, जनतेत डेड: भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत मागच्या मुख्यमंत्र्यात नव्हती – देवेंद्र फडणवीस.

▪️किरीट सोमय्यांनी काढले 4 घोटाळे: म्हणाले – हसन मुश्रीफ यांना पवार, सुप्रिया सुळे यांनी पाठिशी घातले, आता धर्म आठवला का?

▪️बलात्कारी जिलेबी बाबाला 14 वर्षांची कैद: अंमली चहा पाजून 120 महिलांवर केला रेप, न्यूड व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलही करायचा.

▪️अमेरिकेत विमानसेवा ठप्प: संगणकीय प्रणालीत मोठा बिघाड; व्हाईट हाऊसमधील बैठकीनंतर बायडेन यांनी मागितला अहवाल.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.