आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

▪️दिलासादायक! उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 21 टक्के वाढ.!

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई (इंडिया 24 न्यूज )उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी 2019-20 मध्ये 3.85 कोटी इतकी होती, ती आता 2020-21 मध्ये सुमारे 4.14 कोटी झाली आहे. 2014-15 पासून, या पटसंख्येमध्ये सुमारे 72 लाख विद्यार्थ्यांची 21% वाढ झाली आहे.

विद्यार्थी पटसंख्या
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी 2019-20 मध्ये 3.85 कोटी इतकी होती, ती आता 2020-21 मध्ये सुमारे 4.14 कोटी झाली आहे. 2014-15 पासून, या पटसंख्येमध्ये सुमारे 72 लाख विद्यार्थ्यांची (21%) वाढ झाली आहे. तसेच विद्यार्थिनींची पटसंख्या 2019-20 मध्ये 1.88 कोटींवरून 2.01 कोटी झाली आहे. 2014-15 पासून या पटसंख्येत सुमारे 44 लाख (28%) वाढ झाली आहे.

पटसंख्येत ही राज्य आघाडीवर
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान ही सहा राज्ये विद्यार्थी पटनोंदणीत आघाडीवर आहेत. शासकीय विद्यापीठे (एकूण 59%) या पटनोंदणीत 73.1% योगदान देतात. तर, सरकारी महाविद्यालये (एकूण 21.4%) नोंदणीत 34.5% योगदान देतात. 2020-21 मध्ये उत्तीर्ण झालेल्यांची संख्या, 95.4 लाखांपर्यंत वाढली आहे. 2019-20 मध्ये ही संख्या, 94 लाख इतकी होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.