आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाईक जागेत सौचालय बांधल्यामुळे एकाचा खून, पोलिसांत गुन्हा दाखल..!

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभूळकर

अहमदनगर – ( इंडिया 24 न्यूज ) : भाउकीच्या समाईक जागेत सौचालय बांधल्यामुळे झालेल्या तुफान हाणामारीत एकाचा म्रुत्यु झाला आहे. संशयित म्हणून पाच आरोपीच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पैकी दोन आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबतची घटना अशी की अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे भावकीच्या समाईक जागेत एकाने सौचालय बांधल्यामुळे झालेल्या तूफान हाणामारीत एकाचा म्रुत्यु झाला आहे. मयताचे नाव पोपट लक्ष्मण घोरपडे (वय वर्षे५२)रा.शिराळ ता.पाथर्डी, जि.अहमदनगर असे आहे. हल्ली तो पाचुंदा ता.नेवासा येथे विवाहित मुलीकडे वास्तव्यास होता. रविवार दि.२६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी समाईक जागेत सौचालय बांधल्याच्या कारणावरून मयत पोपट लक्ष्मण घोरपडे आणि त्याचे भाउबंद१) ज्ञानदेव गणपत घोरपडे,२)दत्तात्रय ज्ञानदेव घोरपडे,३) सौ.अंजू दत्तात्रय घोरपडे,४)हनुमंत ज्ञानदेव घोरपडे,५)सौ.रोहिणी हनुमंत घोरपडे यांच्यामध्ये सुरवातीला बाचाबाची झाली. मुद्यावरचे भांडण गुद्यावर आले.आणि झालेल्या तुफान हाणामारीत मयताच्या हाता पायाची हाडे मोडली गेली. आणि मुकामार ही लागला. मयतास दवाखान्यात नेत असतानाच वाटेतच म्रुत्यु झाला.उत्तरीय तपासणी नंतर रात्री उशिरापर्यंत मयतावर शिराळातील गडाख वस्तीवरील शेतात पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात मयताचे चुलत बंधू प्रतापराव रामराव घोरपडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा रजिस्टर क्रमांक २२२/२०२३ भारतीय दंडविधान संहिता कलम १४३,१४७,१४८, १४९,३०२ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयत पोपट लक्ष्मण घोरपडे आणि संशयित आरोपी यांच्यात अनेक दिवसांपासून पाथर्डीच्या कोर्टात वाद सुरू आहेत. मयत घोरपडे यांनी चार पाच महिन्यापूर्वी तारखेच्या दिवशी कोर्टाच्या बाहेरील आवारात संबंधीतांना मारहाण केली होती.गेल्या महिन्यात भावकीच्या लग्नातही संबंधीताना शिविगाळ केली होती.तसेच मयताच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात ३२४,३५३ असे अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अशा आशयाची पार्श्वभूमी असलेल्या मयताचा मारहाणीत म्रुत्यु झाला आहे. खुनाची माहिती कळताच अहमदनगर शहर विभागाचे पोलीस उप अधिक्षक अनिल कातकाडे,पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुहास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे,प्रविण पाटील, सचिन लिमकर,पोलीस हवालदार विजय भिंगारदिवे,पो.काँ. अनिल बडे,अप्पासाहेब वैद्य,पोपट आव्हाड, सचिन मिरपगार,देविदास तांदळे,यांनी चोख बंदोबस्त ठेवून परीस्थिती वर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून विषेश प्रयत्न केले. दरम्यान गुन्ह्यातील संशयित आरोपी सौ.रोहिणी हनुमंत घोरपडे, आणि हनुमंत ज्ञानदेव घोरपडे यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून त्यांना अटक केली आहे. बाकीचे तिघेजण फरार झाले आहेत. लवकरात लवकर त्यांच्या ही मुसक्या आवळल्या जातील अशी ग्वाही पाथर्डी पोलिसांनी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.