आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️श्री शांतीनाथ सेवा मंडळातर्फे दिव्यांगांना मोफत कॅलीपर तथा जयपुर फुट वितरण शिबिर – जैन भवनात 8 दिवस चालणार शिबिर..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : यवतमाळ व गडचिरोलीतील दिव्यांगाना मिळणार मदत – महावीर विकलांग सेवा समिती जयपुर तथा सकल जैन समाज चंद्रपूर ह्यांच्या सहकार्याने शिबिराचे आयोजन

मागिल कित्येक वर्षांपासून चंद्रपूर येथिल श्री शांतीनाथ सेवा मंडळ, सकल जैन समाज तथा महावीर विकलांग सेवा समिती जयपुर ह्यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खा. नरेश बाबु पुगलिया ह्यांच्या मार्गदर्शनात दिव्यांगांना सामान्य मानवाप्रमाणे स्वतःच्या पायाने चालता यावे, स्वतःची कामे स्वतः करता यावी तसेच त्यांचे परलंबित्व दुर व्हावे ह्या उदात्त हेतूने चंद्रपूर शहरात दिव्यांगांना मोफत कॅलीपर, जयपुर फूट, कुबड्या तसेच तिन चाकी सायकल त्याचप्रमाणे कर्णबधिरांना कर्ण यंत्र मोफत देण्यात येणार असुन ह्यावर्षी हे शिबिर विदर्भ स्तरावर घेण्यात येणार आहे. ह्या शिबिराचा लाभ चंद्रपूर सह यवतमाळ तसेच गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग बंधु भगिनींना होणार असुन 20 ते 27 मार्च दरम्यान सकाळी 10:00 ते दुपारी 4:00 वाजेपर्यंत शिबिर सुरू राहणार आहे.

नियोजनाप्रमाणे पाहिले तिन दिवस चंद्रपूर जिल्हा, 23 व 24 मार्च यवतमाळ तसेच 25 व 2 7 मार्च गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आले असुन काही कारणास्तव कुठल्याही जिल्ह्यातील दिव्यांग बांधव नियोजित दिवसव्यातिरिक्त इतर दिवशी आल्यास त्यांना आवश्यक ती मदत पुरविण्यात येणार असल्याचे सकल जैन समाजाचे अध्यक्ष तथा माजी खा. नरेश बाबु पुगलीया ह्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी स्था श्रावक संघांचे योगेश भंडारी,शकुंतला बाठीया, सरला बोथरा, अर्चना मुनोत, राजश्री बैद उपस्थित होत्या.संपर्क करण्याकरिता 7588660022,9822247339 मो नंबर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.