आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

स्वराज्य संस्थेच्या निवडणुका साठी एकत्रित सर्व संघटनांची मिळून बैठक “मिशन स्वराज्य क्रांती” या नावाची आघाडी..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. 9403179727

मुल – ( इंडिया 24 न्यूज ) : आज दिनांक 5/11/2025 रोज बुधवार ला मूल येथे वंचित बहुजन आघाडी मुल,बहुजन समाज पार्टी मुल, गोंडवाना गणतंत्र पार्टी मुल,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुल,भूमिपुत्र ब्रिगेड मूल,विषमता निर्मूलन दल मुल व अल्पसंख्यांक सेल या सर्व छत्रपती शिवाजी महाराज, म.ज्योतिबा फुले,राजश्री छत्रपती शाहू महाराज, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके, वीर बीरसा मुंडा,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांची तथा प्रमुख पदाधिकाऱ्यांची मूल नगरपरिषद निवडणूक आणि आगामी होणारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक या विषयावर उल्लेख केलेल्या संपूर्ण संघटनांची व पक्षांची युती तथा आघाडी तयार करून एकत्रितपणे निवडणूक लढण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले तसेच एकत्रित सर्व संघटनांची मिळून ‘ *मिशन स्वराज्य क्रांती’* या नावाची आघाडी तयार करून या आघाडीद्वारे मूल नगर परिषदेची व जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढण्याचा निर्धार करण्यात आला.तसेच आजच्या सभेमध्ये सर्व संघटनांचा समन्वय साधण्यासाठी कोअर कमिटी तथा समन्वय समिती स्थापन करण्यात आली. वरील सभा ही श्री दिलीपजी वाळके जेष्ठ वंचित बहुजन आघाडी कार्यकर्ते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला मूल शहरातील तसेच तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर, वीर बिरसा मुंडा,शहीद बाबुराव शेडमाके यांना मानणाऱ्या व समविचारी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.आजच्या सभेत प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे श्री एडवोकेट रितेश मारकवार तालुकाध्यक्ष, श्री दिलीपजी गेडाम शहराध्यक्ष,श्री बंडूजी भडके, श्री पद्माकर नारनवरे, उषाताई दुर्गे, बहुजन समाज पार्टीचे शांतीकुमार डॉ श्याम गेडाम,प्रा, गुलाब मोरे, मंगलाताई सुधाकर बोरकर,गोंडवाना गणतंत्र पार्टीचे श्री संपत जी कन्नाके, श्री मोरेश्वर वेलके,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे करुणासागर देव, श्री उमेशजी खोब्रागडे,विषमता निर्मूलन समितीचे श्री हिरालालजी भडके, बादल मोहुर्ले, अल्पसंख्याक सेलचे कादिर शेख,भूमिपुत्र ब्रिगेडचे श्री राकेश मोहुर्ले यांची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली.या वेळी हंसराजजी कुंभारे,विलासजी चंद्रगुप्त, दिलीपजी रामटेके,मुरलीधरजी घोनमोडे, यशवंत देवगडे, संजय बाबुराव गेडाम तालुका अध्यक्ष गोगपा, भीमराव इटकेलवार,केशव सोमाजी दुर्गे, मनोहरजी दुर्गे,शालिक भाऊ दहिवले, कपिल मेश्राम बोरचांदली,यादवराव रामटेके,प्रवीण शिडाम गोगपा,अशोकजी रामटेके मुल, नरेश शेंडे, संदीप रामटेके, नितीन निमगडे,जमनलाल निमगडे,पाटील वाळके, प्रीतम खोब्रागडे धम्मदीप गौतम सुनील भडके, रूपदेव खेडेकर,किशोरजी निमगडे,नीलकंठ वाळके,राजेंद्र वाकडे, महादेवजी वाकडे,राजरत्न गोंगले, पुरुषोत्तमजी निमगडे,गुलचंदजी खोब्रागडे, मनोहरजी जांभुळे,निरंजन वाळके,संदीप रामटेके, नरेश शेंडे,मच्छिंद्र गणवीर, लीनाताई गणवीर, मधुकर बनकर, चक्रधर मोहरकर,नितेश मेश्राम,सत्यवान मोहुर्ले, इंद्रपाल पुणेकर,रमेशजी मानकर,निर्दोष गेडाम,वनमालाताई चाटे,यादवराव रामटेके, मिथुन गणवीर,पुरुषोत्तम वनकर व इतर शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.