▪️चंद्रपूरमध्ये 5 ऑक्टोंबरला “महावितरण” च्या क्रीडा निवड चाचणी स्पर्धा..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर 24/09/2025 महावितरणच्या आंतर परिमंडलीय क्रीडा निवड चाचणी स्पर्धा चंद्रपूर येथील तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर (विसापूर) ता.जि. चंद्रपूर येथे 5 ऑक्टोबर 2025 ला ठेवण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत चंद्रपूरसह नागपूर आणि गोंदिया परिमंडळाचा सहभाग असणार आहे. त्यामध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील वीज कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तसेच या सर्व विभागातील एकूण 25 खेळामध्ये सुमारे 400 खेळाडू सहभागी होणार आहेत. तसेच क्रिकेट या खेळासाठी चाचणी स्पर्धा सेंट माइकल स्कूल क्रीडा संकुल रामनगर चंद्रपूर येथे पार पडतील.
या कार्यक्रमाचे उद्घाटन 5 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर (विसापूर) येथे होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. सुहास रंगारी मुख्य अभियंता गोंदिया परिमंडळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. हरीश गजबे मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. दिलीप दोडके नागपूर परिमंडळ, आणि प्रमुख उपस्थिती श्री. रमेश सानप अधीक्षक अभियंता (पा.आ.) चंद्रपूर परिमंडळ, श्रीमती संध्या चिवंडे अधीक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ, श्री. प्रकाश खांडेकर अधीक्षक अभियंता गडचिरोली मंडळ यांच्या हस्ते पार पडणार आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या क्रिडा कौशल्याला वाव देण्यासाठी मुख्य अभियंता श्री. हरीश गजबे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.



