आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

▪️चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार )पक्षा तर्फे मा. पवार साहेबांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आदरणीय .पवार साहेबांचा वाढदिवस शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या पढाकारातून चंद्रपूर शहरातील शासकीय सामान्य रुग्णालय चंद्रपूर, श्यामा प्रसाद मुखर्जी शाळा लालपेठ ,डेबू सावली वृद्धाश्रम देवळा, किलबिल बालकुंज प्राथमिक शाळा जठपुरा चंद्रपूर व विविध विशेष शाळांमध्ये केक कापून शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य फळ बिस्कीट तर सामान्य रुग्णालयात रुग्णांना व डेबू सावली वृद्धाश्रमात फळ बिस्कीट मिठाई वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासत आदरणीय. पवार साहेबांचा वाढदिवस मोठया उत्सवात साजरा करण्यात आला.

या उपक्रमात पक्षाचे प्रदेशसरचिटणीस हिराचंद बोरकुटे, युवक शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मल्लारप ,अल्पसंख्यांक शहर जिल्हा अध्यक्ष बब्बू भाई इसा शेख,आदिवासी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम, ,ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की ,अर्बनसेलचे शहरजिल्हाध्यक्ष संजय वैद्य, चंद्रपूर विधानसभा सभा अध्यक्ष सुरज चव्हाण ,महिला शहर जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील ,अल्पसंख्यांक युवक जिल्हाध्यक्ष समीर खान ,शहर उपाध्यक्ष आनंद तिरानकर ,शहर सचिव अरविंद परचाके ,आरीप सय्यद ,नीलखंट येरमे ,प्रशांती दुर्गम, भैय्याजी मानकर, पल्लवी म्याडम, लता जांभुळकर ,नीलिमाआत्राम ,सुनंदा महाते ,शोभा घरडे ,कविता धकाते ,पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.