आपला जिल्हाक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️इंदिरानगर परिसरात ५० हजारांचा मुद्देमाल जप्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर शहरातील इंदिरानगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या आदेशान्वये उपविभाग चंद्रपूर येथील LCB स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रोव्हीशन, जुगार रेड तसेच प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना मुखबिरामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत मनिष सुरेश राउत (वय 47 रा. बॉम्बे प्लॉट, राजीव गांधी नगर, चंद्रपूर) याच्याकडून विविध रंगांच्या प्लास्टिक चक्रीवर गुंडाळलेला 24 नग प्रतिबंधित नायलॉन मांजा धागा, किंमत अंदाजे 24,000 रुपये जप्त करण्यात आला. तसेच एकनाथ केशव चवरे (वय 52 रा. बॉम्बे प्लॉट, इंदिरानगर, चंद्रपूर) याच्याकडून 26 नग प्रतिबंधित नायलॉन मांजा धागा, किंमत अंदाजे 26,000/- रुपये असा एकूण 50,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे पर्यावरण (संरक्षण) अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, पोअ किशोर वाकाटे, शशांक बदामवार, हिरालाल गुप्ता, मपोहवा छाया निकोडे व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.