ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात पुन्हा ५ अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन दाखल..

▪️गुन्हे तपासाला मिळणार दिशा..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर : ( इंडिया 24 न्युज ) जिल्हयात घडणाऱ्या गंभीर गुन्हयांमध्ये घटनास्थळी परिस्थितीजन्य शास्त्रीय पुरावे संकलनासाठी प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) कार्यरत असुन कोणत्याही गंभीर गुन्हयांच्या तपासाला व संवेदनशील किंवा कोणत्याही मर्डर मिस्ट्रीत वैज्ञानिक दिशा आणि अधिक सबळ पुरावे प्राप्त करण्यासाठी जिल्हयात दोन अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत आहेत.
नुकतेच चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात प्रत्येक उपविभागासाठी एक प्रमाणे अशा एकुण ५ नविन अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तज्ञांसह दाखल झाले आहेत.

▪️मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे वैशिष्टे : भौतिक पुरावे संकलन रक्त, केस, कपडे यांचे नमूने थेट घटनास्थळी संकलित करता येतात. बोटांचे ठसे तपासणी : गुन्हेगार ओळखण्यासाठी म्हत्वपूर्ण ठसे त्वरित नोंदवले जातात. प्रयोगशाळेत विश्लेषण: संकलित केलेल्या नमुन्यांची शास्त्रीय तपासणी.. मोबाईल व्हॅन मध्ये स्फोटक पदार्थ तपासणीसाठी आवश्यक किट्स

▪️रक्त, डिएनए टेस्टिंग सॅम्पल : लैगिक अत्याच्याराच्या गुन्हयातील प्रत्यक्ष पुरावे गोळा करण्याची व्यवस्था.. सदरच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व त्यात नेमण्यात आलेले फॉरेन्सिक तज्ञांचे कुशल टिमच्या मदतीने पोलीस तपास पथकास गुन्हयाच्या तपासात, गुन्हयाच्या घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन घटनास्थळावर आढळून येणारे बारीक, सुक्ष्म पुरावे तसेच न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडील रासायनिक तसेच जीवशास्त्र विश्लेषण आदी अनेक बाबींचा बारकाईने अभ्यास करुन, तपासात पुराव्यांची साखळी जोडून, आरोपीविरुध्द न्यायालयात खटला पाठविण्यात येतो. नव्या फॉरेन्सिक वाहनांची पोलीस पथकाला मोठी मदत होणार असून, गुन्हे निकाली काढण्यास व शिक्षेचे प्रमाण वाढविण्यास गती मिळणार आहे.

पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सात ही वाहने चंद्रपूर जिल्हयातील (१) चंद्रपूर उपविभाग, (२) वरोरा उपविभाग (३) चिमूर उपविभाग, (४) ब्रम्हपुरी उपविभाग, (५) मुल उपविभाग (६) राजुरा उपविभाग आणि (७) गडचांदूर उपविभागात कार्यरत राहणार आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.