▪️स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची मोठी कारवाई एकूण ८ किलो ७९५ ग्रॅम अमली पदार्थ (गांजा) जप्त..
▪️रहमत नगर वार्ड येथे अमली पदार्थ (गांजा) विकी करणाऱ्या गुन्हा दाखल..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक ०२ एप्रिल, २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकास गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार अब्दुल शाहरुख अब्दुल रज्जाक वय ३५ वर्ष रा. दर्गा वार्ड घुटकाला चंद्रपूर व त्याचा साथीदार इसम मोबीन रा. चंद्रपूर यांनी मिळुन रहमत नगर केजीएन लॉन जवळ राहणारे साबीराबी रफीक शहा यांचे घरी एक रुम किरायाने घेवुन तेथे अवैधरित्या विक्री करीता गांजा साठवुन ठेवला आहे. अशा खात्रीशिर माहितीवरुन सदर ठिकाणी छापा टाकला असता, साबीराबी रफीक शहा यांचे घरी किरायाने दिलेल्या रुम मध्ये एक पिवळया रंगाच्या बोरी मध्ये प्लॉस्टीक पॉलीथीन मध्ये अमली पदार्थ गांजा सदृश्य हिरवट रंगाची सुकलेली वनस्पनी पाने, फुल, देड व बिया असलेली एकुण वजन ८ किलो ९१५ ग्रॅम बाजार भाव प्रति किलो १०,०००/-रु. प्रमाणे एकुण ८१,१५०/- रुपयाचा माल मिळुन आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. व पाहिजे असलेले आरोपी क्र. १) अब्दुल शाहरुख अब्दुल रज्जाक वय ३५ वर्ष रा. दर्गा वार्ड घुटकाला चंद्रपूर व त्याचा साथीदार आरोपी २) मोबीन रा. चंद्रपूर याचेविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ NDPS अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंदपूर यांचे नेतृत्वात सपोनि श्री बलराम झाडोकार, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पोलीस अंमलदारांनी केली आहे.



