▪️जिबगांव येथे कलार समाज संघटना तर्फे कन्सर शिबीर, निःशुल्क मोतीबिंदू उपचार, शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
सावली – ( इंडिया 24 न्युज ) : कलार समाज ता सावली जिल्हा चंद्रपुर यांचे वतीने जिबगांव येथे 12 फरवरी ला 11ते 3 वाजेपर्यंत शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यमाचे उद्घाटन डॉ विजय जी शेंडे,सह उदघाटक नरर्शिग गणवेणवार, अध्यक्ष चंदुजी मारगोनवार,तर विशेष अतिथी प्रशांत पाटील चिटनुलवार, अंकुश शेंडे, प्रमोद पा बोमनवार,दिलीप मंडलवार,जिबगांव येथील सरपंच पुरुषोत्तम चुदरी, डॉ गोबाडे सर प्रा आरोग्य केंद्र जिबगाव, डॉ करडे सर प्रा आरोग्य केंद्र लोढोली,सोनल म्यडम कन्सर नागपुर, डॉ डोगरवार महात्मे नागपुर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
जिबगांव येथे कलार समाज संघटना तर्फे निःशुल्क मोतीबिंदू उपचार, शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिराचे आयोजन महात्मे आय बँक आय हॉस्पीटल नागपूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती चंद्रपूर द्वारे करण्यात आले या शिबिरात एकुण,375 नागरीकानी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर,व कन्सर व आरोग्य शिबिर करीता उपस्थित होते त्या पैकी
82 रुगनाना कलार समाज ता सावली जिल्हा चंद्रपुर यांचे वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात आले काही रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर करण्यासाठी पाठवण्यात आले आहे तर काही रुग्ण कन्सर ची तपसानी करण्यात आली. यावेळी उपस्थित मा. वैद्यकीय अधिकारी डॉ.करडे सर समुदाय आरोग्य अधिकारी वृषाली जी.थुल मॅडम आरोग्य सेवक श्री. घुगे साहेब फ्लेबोटोमिस्ट गिरीश नैताम प्राथमिक आरोग्य केंद्र जिबगाव येथील तपासे सर जराते सिस्टर. मेश्राम सिस्टर यांनी सहकार्य केले व या कार्यक्रमा यशस्वी साठी राकेश गोलेपल्लीवार,कलार समाज अध्यक्ष सावली तालुका सावली,प्रवीणजी झोडे,आशिष गडपल्लीवार, उमेश गोलेपल्लीवार,नरेश गडपलीवार प्रशांत मेरफुलवार, नामदेव जी डांगे, पंकज पाल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले यावेळी कलार समाज व जिबगांव परीसरातील जनतेची मोठ्या संख्येने उपस्थित होते.



