◼️सिंदेवाही वनपरिक्षेत्रात जागतिक वनदिन विविध उपक्रमांनी साजरा

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:(इंडिया २४ न्यूज) दि.२१/०३/२०२६
ब्रह्मपुरी वनविभागातील सिंदेवाही वन परिक्षेत्रात जागतिक वनदिन उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, तसेच वनाग्नि प्रतिबंध याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
यानंतर जनजागृतीसाठी वनपरिक्षेत्रातील विविध भागांत मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे नागरिकांना वनाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण आणि जंगलातील आगीपासून बचाव करण्याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला.
तसेच मोहाच्या झाडाभोवती ब्लोअरच्या साह्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमांद्वारे झाडाच्या परिसरातील कोरडी पाने व ज्वलनशील पदार्थ दुर करून वनाग्निचा धोका कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) प्रमुख उपस्थित होत्या, त्यांच्यासोबत क्षेत्रसहाय्यक श्री नितीन गडपायले (सिंदेवाही) श्री प्रणय मानकर (गुंजेवाही) श्री संतोष पेंदाम (तांबेगडीमेंढा) श्री रवी सिडाम (नवरगाव) यांच्यासह वनकर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा उपक्रमामुळे वनसंवर्धनाबाबत जनजागृती वाढून, पर्यावरण रक्षणासाठी समाजाचा सहभाग अधिक दृढ होईल. असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



