▪️ग्रामीण निकसाचे उल्लंघन करून ग्रामीण क्षेत्राच्या जागा बळकावल्या?
▪️जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा निवड यादी सदोष असल्याने पालकांची मागणी

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
नागभिड – ( इंडिया 24 न्युज ) : जवाहर नवोदय विद्यालय (JNV) इयत्ता ६ वी प्रवेश निवड प्रक्रिया ही मुख्यत्वे जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) या प्रवेश प्रवेशावर आधारित असते.ही प्रक्रिया ऑनलाइन अर्ज, परीक्षा, गुणवत्ता यादी आणि कागदपत्रे निकाल
पडताळणी या घटकांतून होते. 75% जागा ग्रामीण व्यवसायासाठी राखीव असतात.
किंमतीची टीप अशी आहे की,ग्रामीण विद्यार्थी, ज्यांनी ३, ४ आणि ५ वी की स्कूल ग्रामीण भागात, त्यांना प्राधान्य दिले जाते. असे असताना या वर्षीच्या निवड यादीत शहरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण क्षेत्राच्या जागा बळकावल्याचा आरोप जिल्यातील काही पालकांनी केला आहे.याबाबतचे निवेदन दिनांक २०/०३/२०२६ ला मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना न्यायासाठी दिल्याचे दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना झालेली असून त्यांच्या नियमानुसार ७५ टक्के जागा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात. तसेच जे विद्यार्थी नगर पंचायत, नगर परिषद, नगर पालीका, महानगरपालीका हद्दीतील शाळा व कॉन्व्हेंट मध्ये इयत्ता ३’ ४ व ५ या वर्गात शिकले आहेत किंवा शिकत आहेत त्यांची गणना शहरी विद्यार्थी म्हणून केली जाते. असे असतांना सुध्दा यादीतील अनुक्रमांक २५ वरील नेहल महेश साखरकर, सेंट क्लॅरेट इंग्लिश मिडीयम स्कुल चिमूर
यादीतील अनुक्रमांक ३० वरील युगलकिशोर योगीराज सहारे इयत्ता ३ व ४ सेंट क्लॅरेट इंग्लिश मिडीयम स्कुल चिमूर व इयत्ता ५ वी कॉन्व्हेंट ब्रम्हपूरी, यादीतील अनुक्रमांक ८ वरील देवांशू मंगेश कामडी, देवयानी इंटरनॅशनल स्कुल, सिंदेवाही या शहरी विद्यार्थ्यांची निवड ग्रामीण मधून झालेली आहे.
सिंदेवाही तालुक्यातून एकुण १९ विद्यार्थी यादीमध्ये असून सिंदेवाही नगर पंचायत/नगर परिषद अंतर्गत देवयानी इंटरनॅशनल स्कुल सिंदेवाही, प्राजक्ता विद्या मंदिर सिंदेवाही, कल्पतरू विद्या मंदिर सिंदेवाही येथील अनेक शहरी विद्यार्थ्यांची ग्रामीण मधून निवड झालेली आहे.
वरील माहितीवरून असे लक्षात येते की, चंद्रपूर जिल्हयाच्या शहरी विभागातील अशा किती विद्यार्थ्यांनी ग्रामीणच्या जागेचा लाभ घेतलेला असावा? याबाबत चौकशी करणे गरजेचे आहे. असे पालकांनी निवेदनात म्हटले आहे.
ग्रामीण निकष मुख्य बिंदू:
* विद्यालयाचे स्थान: विद्यार्थी ३, ४ आणि ५ शिक्षण ग्रामीण भागात स्थित सरकारी या सरकारी मदत/मान्यता प्राप्त
शाळेत झालेली असावी.
* निवास आणि पढ़ाई: उम्मीदवार ने ज्या जिल्ह्यात नवोदय विद्यालय आहे, त्याच ग्रामीण भागात ५ वी मध्ये शिक्षण घेतलेले असावे.
* सीमा बंधन: तीन भागांत (वर्ग ३,४,५) शैक्षणिक वर्षांचे कालावधी ग्रामीण शाळांमध्ये पूर्ण केलेले असले पाहिजे.
* प्रमाण पत्र: निवडी नंतर सक्षम प्राधिकारी (जसे की तहसीलदार/गट विकास अधिकारी) द्वारे सतत ग्रामीण स्थिती प्रमाण पत्र आवश्यक आहे.
* शहरी क्षेत्र: जर कोणी विद्यार्थी ने विद्यार्थी ३,४ किंवा ५ मध्ये कोणत्याही वेळी शहरी क्षेत्रातील शाळेत शिकला आहे, तर त्याला शहरी उम्मीदवार समजले जाईल.
पालकांचा आरोप : शहरी विभागातील विद्यार्थ्यांना सर्वप्रकारच्या शैक्षणिक सुविधा प्राप्त असून हे विद्यार्थी जर ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयातील शिक्षणापासून दूर असून शासनाची दिशाभुल करीत असतील तर ग्रामीण विद्यार्थ्यावर शैक्षणिक व सामाजिक अन्याय होत आहे असे म्हणावे लागेल.
पालकांची मागणी:
चंद्रपूर जिल्हयातील सर्व विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाचे प्रमाणपत्र देत असतांना सबंधिताचे इयत्ता 3, 4 व 5 चे गुणपत्रक व इतर पुरावे तसेच त्यांची शाळा कोणत्या क्षेत्रात येते याबाबत खातरजमा करूनच प्रमाणपत्र देण्याचे प्रयोजन करावे व आमच्या ग्रामीण विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा.
अशी मागणी निवेदनाद्वारे मा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे मैत्रय दामोधर रामटेके, शिर्ष मंगेश चाचरकर,साची मदनपाल येसांबरे, तनुजा सुनिल खाटे सायली उमदेव गजभे,महेंद्र धनराज बारसागडे यांनी केली असून निवेदन प्रत मा. तहसिलदार तहसिल कार्यालय चिमूर,मा. तहसिलदार तहसिल कार्यालय सिंदेवाही मा. प्राचार्य, पी.एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय, तळोधी (बा) चंद्रपूर यांना सादर केली आहे. ग्रामीण निकसाचे मुख्य बिंदूचे उल्लंघन झाल्याने, प्रशासना कडून न्याय मिळतो की,बेकायदेशीर निवड कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



