▪️आ. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवा प्रकल्पांचे आयोजन..

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : मा. डॉ. सुधीर मुनगंटीवार आमदार, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ व माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य – यांच्या वाढदिवसानिमित्त 30 जुलै 2025 रोजी “सेवा दिवस” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिवशी संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विविध समाजोपयोगी आणि आरोग्यवर्धक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष दिवशी आयोजित करण्यात आलेल्या काही महत्त्वपूर्ण सेवा प्रकल्प पुढीलप्रमाणे:
▪️कॅन्सर रोग निदान शिबिर:-
🔹 नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिरे..🔹 वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी साहित्य वितरण..
हिअरिंग एड (श्रवणयंत्र), व्हील चेअर,कमोड सीट, साधी काठी,
बसण्यासाठी कुशन व्यवस्था, कमरेचा पट्टा,मानेचा पट्टा, गुडघ्याच्या पट्टा, इतर सहाय्यक साहित्य
🩸रक्तदान शिबिरे :- युवकांमध्ये जनजागृतीसह रक्तसाठा वाढवण्यासाठी विशेष मोहीम
🔹 महाआरती व सामूहिक प्रार्थना कार्यक्रम
🔹 कामगार वर्गासाठी धनुर्वात प्रतिबंधक इंजेक्शन मोहीम
🔹 शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप
ही सर्व सेवा शिबिरे व कार्यक्रम जिल्ह्यातील विविध भागांमध्ये लोकसहभागातून आणि डॉक्टर मुनगंटीवार यांच्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित करण्यात आले आहेत.
या सेवाभावी उपक्रमांद्वारे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. डॉक्टर मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून हा वाढदिवस फक्त उत्सव नसून “समाजासाठी समर्पण” या तत्त्वाने सुधीर भाऊ मित्र परिवारातर्फे साजरा होणार आहे. या सेवा प्रकल्पामध्ये समस्त नागरिकांनी तथा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन.. हरीश शर्मा जिल्हाध्यक्ष चंदनभैय्या चंदेल प्राध्यापक अतुल देशकर डॉ. मंगेश गुलवाडे महामंत्री संध्याताई गुरनुले विवेक बोढे महामंत्री, राहुल पावडे, राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, महेश देवकाते, विशाल निंबाळकर, रामपाल सिंग, सविता कांबळे, नम्रता ठेमसकर, किरण बुटले,सुरज पेदुलवार, प्रज्वलन कडू,राजीव गोलीवार, धनराज कोवे धम्मप्रकाश भस्मे श्रीनिवास जंगमवार, रणजयसिंग, उमेश आष्टणकर, अमित निरंजने, होमेश्वर नंदनवार, गणेश रामगुंडेवार, निलेश पझारे व समस्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.