ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️गॅस सिलेंडर संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन..

▪️महिलांनी चुलीवर भाकर थापून नोंदविला निषेध; तहसीलदारांना दिले निवेदन..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

अकोट – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यात गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून, या ज्वलंत प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक चुली पेटवून त्यावर भाकर थापत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. “भाकर द्या, गॅस नको” अशा घोषणा देत केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली.
या वेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्यास मजबूर होत आहेत. सरकारने तात्काळ दरकपात करावी, तसेच गरीब व गरजू नागरिकांना अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

यानंतर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन गॅस दरवाढीचा निषेध नोंदविला. तसेच काळाबाजार रोखावा, अवैध सिलेंडर विक्रीवर कारवाई करावी आणि नागरिकांना नियमित व स्वस्त दरात गॅस उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.