▪️ पं.दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान-२०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राजुरा ग्रामीण मंडळाच्या दोन दिवसीय निवासी कार्यशाळेचे काल (दि.७) भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.
भाजपची विचारधारा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व भाजपाचा सेवाभावी विचार समजून घेण्यासाठी दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण गरजेचे आहे. या प्रशिक्षण महाअभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजनांची माहिती,पक्ष संघटन बांधणी यासारख्या नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळत आहे. त्यामुळे राजुरा ग्रामीण मंडळातील जास्तीत जास्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवासी कार्यशाळेत पूर्णवेळ उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले.
प्रसंगीच एसआयआर अभियान प्रमुख सतीश उपलेंचवार,समीर केणे,अमित गुंडावार,यश बांगडे यांनीही विविध विषयांवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष वामन तुराणकर, शहराध्यक्ष सुरेश रागीट, महामंत्री दिलीप गिरसावळे, हरिदास झाडे,सचिन बल्की,महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा पौर्णिमा उरकुडे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय राठोड, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर, यशोधरा निरांजने,रेश्मा चव्हाण, गौरी सोनेकर यांचेसह राजुरा तालुका ग्रामीण मंडळातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



