ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️कावसा येथे अवैध दारूविक्री व जुगाराविरोधात जनजागृतीपर आमसभा संपन्न.. ग्राम रक्षक दलाच्या माध्यमातून गाव दारू मुक्त करणार..!

▪️सीमा झांमरे पोलीस अधीक्षक दारू बंदी अधिकार यांचे ग्रामसभेत प्रतिपादन..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

अकोट – ( इंडिया 24 न्युज ) :
अकोट तालुक्यातील कावसा व तरोडा परिसरात वाढत्या अवैध दारूविक्री व जुगाराच्या प्रकारांबाबत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असताना व्यसनमुक्त, निरोगी व सुसंस्कृत समाज घडविण्याच्या उद्देशाने कावसा बुद्रुक येथे जनजागृतीपर आमसभा उत्साहात पार पडली. ही सभा दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता जनता विद्यालय, कावसा येथे आयोजित करण्यात आली होती. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्यसनमुक्त समाज निर्मितीचा निर्धार व्यक्त केला. या ग्रामसभेला संबोधताना गावातील दारू बंद करण्याकरता गावात ग्रामरक्षक दल स्थापन करून गावातील महिलांना दारूबंदीचे अधिकार देऊन कावसागाव दारू मुक्त करण्याचा निर्धार या ग्रामसभेला संबोधताना पोलीस अधीक्षक दारूबंदी सीमाताई झावरे यांनी व्यक्त केला .
सभेला दारूबंदी विभाग, पोलीस प्रशासन व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस अधीक्षक (दारूबंदी) सीमाताई झावरे, पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, दहीहंडीचे ठाणेदार गोपाल ढोले , ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, पत्रकार संजय गावंडे, सरपंच शिवदासजी बुटे, उपसरपंच पांडुरंग वानखडे, तरोडा गावच्या सरपंच सुनिता राजेश दामोदर , समाजसेवक देवरावजी अहिर, समन्वय बुध विहार महासंघ अकोलाचे अध्यक्ष धम्मबोधी डोंगरे, माजी पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखडे, संतोष भटकर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अकोट, राजेश राठोड, उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अकोला, महेंद्र सोनार, उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अकोला, श्रीमती वैशाली धुरंदर उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अकोला अकोट,सामाजिक कार्यकर्ते गजानन कदम, हरिभाऊ लोणकर , पीएसआय सोपान डाबेराव, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद लांडगे,पोलीस पाटील निळकंठ सावरकर, विठ्ठल तळी तंटामुक्ती अध्यक्ष, माजी सरपंच माधुरीताई वानखडे, तलाठी शितल कोकदे,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून जनजागृती सभेला सुरुवात झाली उपस्थित मान्यवरांचे गावच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध दारूविक्री व जुगार अड्ड्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून युवकांचे भविष्य धोक्यात येत असल्याची खंत व्यक्त केली. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी एकजुटीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अवैध धंद्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून नागरिकांनी धैर्याने पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
सभेमध्ये अवैध दारूविक्री व जुगार अड्डे रोखण्यासाठी कायदेशीर उपाययोजना, तक्रार प्रक्रिया, तसेच ग्रामस्तरावर जनजागृती वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी सामाजिक उपक्रम राबविणे, कुटुंबव्यवस्था मजबूत करणे व शिक्षणाबरोबरच नैतिक मूल्यांची जपणूक करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प केला. कावसा, तरोडा व परिसरातील नागरिकांनी महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवून अवैध दारूविक्री व जुगाराविरोधात ठाम भूमिका घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सजग नागरिक कावसा-तरोडा, ता. अकोट, जि. अकोला यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य उषा वानखडे, पांडुरंग वानखडे उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते मोहन सावरकर, अनिल वानखडे उपसरपंच तरोडा, गोपाल सावरकर,भास्कर जाधव, सौ सरला टेकाडे, मीना मडोकार, सुनंदा चंदन, गणेश पोहकार, विठ्ठल दामोदर, सुमित्रा वानखडे, गणेश दामोदर, सुभाष मोडोकार, दादाराव वानखडे, नितीन चिंचोलकर, सुशीला पोहरकर, पद्मा वानखडे, शोभा इंगळे, इंदुबाई वानखडे, विठ्ठल दामोदर, गोपाल वानखडे, राहुल वानखडे, यमुनाबाई वानखडे, विशाखा वानखडे , अन्नपूर्णा वानखडे, अलका वानखडे, सुनिता डोंगरे, पंचफुला निखाडे आदीनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन पत्रकार सोनू जाधव यांनी तर आभार प्रदर्शन मा. पोलीस निरीक्षक मनोहर वानखडे यांनी तर प्रास्ताविक समाजसेवक गजानन हरणे यांनी केले. कार्यक्रमाला कावसा पंचकोशीतील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.