▪️वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय व जोगापूर वन पर्यटन सफारीचे उद्घाटन…

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) :वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, मध्य चांदा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या राजुरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि या भागातील वन पर्यटकांसाठी सोयींचे ठरलेल्या जोगापूर वन पर्यटन सफारीचे काल (दि.८) उद्घाटन केले.
राजुरा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाची इमारत अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज करण्यात आली आहे. या कार्यालयामुळे वनविभागाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येईल आणि नागरिकांनाही आपल्या समस्या या कार्यालयात परखडपणे मांडता येईल. तसेच जोगापूर ‘वन पर्यटन सफारी’ मुळे पर्यटकांना वन्यजीवांचे जवळून दर्शन घेता येईल, आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने नियमांचे पालन करून पर्यटन प्रेमींनी ‘वन पर्यटन सफारी’ चा आनंद घ्यावा,असे आवाहन केले.
यावेळी माझ्यासमवेत उपवनसंरक्षक योगेश वाघाये, विभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर,भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे,भाजपाचे राजुरा तालुकाध्यक्ष वामन तुराणकर,शहराध्यक्ष सुरेश रागीट, वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे,शहर महामंत्री सचिन भोयर, नगरसेवक प्रफुल कावळे, भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रफुल घोटेकर, उमेश गोरे,अमोल मोरे,वैभव पावडे,शिवा बोंकुर,किशोर रागीट,विवेक राठोड यांचेसह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



