आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पो. स्टे. मुल यांची उल्लेखनिय कामगीरी आरोपीस २४ तासात ठोकल्या बेळ्या..

 

▪️स्टेशन मुल डि. बी पथक मोठी यांची कारवाई १,३५,०००/- रू मो.सा. चा माल जप्त..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

मुल – ( इंडिया 24 न्युज ) याप्रमाणे आहे कि फिर्यादी रूपेश रघुनाथ पेंदोर वय २२ वर्ष रा. मरेगाव ता. मुल जि. चंद्रपुर यास यातील नमुद आरोपी याने सोबत जेवण करू असे बोलुन फिर्यादीचे मोटार सायकलने श्री साई धाबा मुल येथे घेवुन गेला नमुद घटना ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी हा धाब्यामध्ये जेवण करित असतांना यातील नमुद आरोपी याने फिर्यादीची मोटार सायकलची चाबी घेवुन थाब्याचे बाहेर उभी असलेली मो.सा. Hero Splender Plus DRS कंपनीची मो.सा.क MH-34-CT-1206 कि.अं.७०,०००/- रूपयाची चोरी करून घेवुन गेला. अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पोलीस ठाणे मुल येथे अपराध क ३०३/२६ कलम ३०३ (३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयातील अनोळखी आरोपी याचा तांत्रीक पदधतीचे आधारे शोध घेतला असता आरोपी हा बेबाळ येथे गुन्हयातील मोटार सायकल चोरी सह मिळुन आला. त्यास सदर गुन्हयात अटक करून विचारपुस केली असता त्याने पोस्टे मुल येथे दाखल अपराध क ३०३/२६ कलम ३०३ (२) भा. न्या. स. मधील बस स्थानक परिसरातुन चोरी केलेली मोटार सायकल Honda shine कंपनीची मो.सा. क MH-34-BQ-4924 कि.अं. २५,०००/- रूपयाची तसेच अप क ३०८/२६ कलम ३०३ (२) भा.न्या.स. बस स्थानक परिसरातुन चोरी केलेली मोटार सायकल. Hero Splender कंपनीची मो.सा. क MH-34-AY-4611 कि.अं.४०,०००/- रूपयाची बाबत चोरी केल्याची कबुली दिल्याने ते मोटार सायकल बोरचांदली व राजाली येथुन जप्त करण्यात आले. असे तीन मोटार सायकल एकुण कि.अ. १,३५,०००/- रूपयाचा मुददेमाल जलगतीने आरोपीचा शोध घेवुन मोटार सायकल जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आले.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन सर, मा. अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे सर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले मुल, पो. नि. विजय राठोड सर, कार्यवाही करणारे अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन मुल स.पो.नि. सुबोध वंजारी पो. स्टे. मुल, पोहवा भोजराज मुंडरे, ब न २३९७ नापोअं चिमाजी देवकते, ब न २४९७, पो.अ. दिलीप आदे ब.न.२७१०, पोअं शंकर बोरसरे ब न १२३२, पोअं संदीप चुदरी बन १३९, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन मुल डि. बी पथक यांनी तांत्रीक पध्दतीने व कौशल्यपुर्वक उत्कुष्ठ तपास केले असुन बस स्थानक परीसर मथुन मोटार सायकल चोरी करणारा आरोपी यास २४ तासाचे आत पकडुण मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्यात यश आले आहे. सदर गुन्हयातील आरोपीस वि. न्यायालय मुल यांचे कडुन १४ दिवसाचा मॅजीस्टेड कस्टडी रिमांड मिळुन आला असुन आरोपी जिल्हा मध्यवर्ती कारागृह चंद्रपुर येथे बंदीस्त आहे. पुढील तपास डि. बी. पथक करित आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.