▪️जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘जनआक्रोश धरणे आंदोलन’..
▪️वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
सांगली – ( इंडिया 24 न्युज ) : १७/०७/२०२५ सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय महाविद्यालय येथील न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासकीय बदली कर्मचारी अनेक वर्षापासून कायम नोकरीपासून वंचित आहे वीस तीस वर्ष नोकरी करूनही त्यांच्या पदरी निराशा आहे. मे. मॅट कोर्ट मुंबई यांनी नोकरीत रिक्त जागेवर कायम करा. तसेच लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसांना हक्कानुसार अनुकंपावर नोकरीत सामावून घ्यावे असे आदेश असतानाही प्रशासनाने त्यांना जाणीवपूर्वक अलिप्त ठेवले आहे. कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलन केले.परंतु प्रशासनाने त्यांच्या निवेदनास प्रतिसाद दिला नाही. प्रशासकीय अधिकारी हे अल्पशिक्षित असणारे श्रमिक कष्टकरी शासकीय चतुर्थश्रेणी बदली कामगारांची दिशाभूल व फसवणूक केली आहे. शासकीय बदली कामगारांना रिक्त जागेवर विनाविलंब कायम करावे असे मे. मेट कोर्टाचा आदेश असतानाही झुलवत ठेवले आहे. शासकीय कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल मधील सर्व जबाबदार असणारे प्रशासकीय अधिकारी यांना दोषी ठरवून तसेच त्यांच्या आजतागायत केलेल्या कामाची चौकशी करून तसी नोंद त्यांच्या सेवा पुस्तकेवर घ्यावी याचबरोबर शासकीय बदली कामगारांचा केलेल्या कामाचा आजपर्यंतचा फरक वसुल करून शासकिय आरोग्य सेवा चतुर्थ श्रेणी बदली कामगारांच्या बँक अकाउंट वर जमा करावा. श्रमिक, कष्टकरी, सिव्हिल हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेजमधील न्यायालयान शासकीय बदली कामगार हे, वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन जी संघटना गोरगरीब कर्मचाऱ्यांच्या साठी काम करणारी संघटनेला संपर्क साधला असून. सदर कर्मचाऱ्यांच्या कायम नोकरी व वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरीचा संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी या करिता लोकशाही मार्गाने एक दिवसीय ‘जनआक्रोश’ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनस लवकरात लवकर न्यायालयान शासकीय बदली कामगारांना न्याय द्यावा अन्यथा मा. आयुक्त, वैद्यकीय विभाग, मुंबई यांच्या कार्यालयावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाची असेल असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, कोषाध्यक्ष हिरामण भगत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, जिल्हा सदस्य परसराम कुदळे यांच्या सोबत सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील कर्मचारी मोहन गवळी, सुमन कामत,
किशोर कुरणे, रविंद्र श्रीवास्तव, राकेश कांबळे, दशरथ गायकवाड, मोहन आवळे, धर्मा कांबळे, राजू कांबळे, राजेंद्र आठवले, बापू वाघमारे, बबन वायदंडे सिव्हिल हॉस्पिटल मधील तसेच मेडिकल कॉलेजमधील शासकीय बदली कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.