आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️७% नफ्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूकप्रकरणी गंभीर दखल..

▪️मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्याकडून सखोल तपासाला सुरुवात..

 

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर जिल्यातील अनेक सामान्य नागरिक ७% मासिक नफ्याच्या आमिषाने मोठ्या आर्थिक फसवणुकीला बळी पडले असून, हे प्रकरण सध्या जिल्ह्यात गंभीर चिंता आणि अस्वस्थतेचा विषय ठरत आहे. या प्रकरणी गुंतवणूकदारांनी थेट मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन आपबिती मांडली आणि न्यायासाठी मदतीची विनंती केली.

या पार्श्वभूमीवर मा. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने हे प्रकरण लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री व माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महामंत्री रामपाल सिंग,मनोज सिंघवी,नम्रता ठेमस्कर,किरण बुटले, उमेश अष्टणकर व भाऊंचे स्वीय सहाय्यक संजय राईंचवार यांच्या शिष्टमंडला पाठवून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांची भेट घेऊन सदर प्रकरण तातडीने सोडविण्यासाठी संपूर्ण सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.
यानंतर पोलीस अधीक्षकांनी गुंतवणूकदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि संबंधित प्रकरणात तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश दिले.

गुंतवणुकीच्या नावाखाली श्री. संजय हांडेकर (रा. सिंदेवाही) आणि श्री. कैलास लांडगे (रा. बाबुपेठ, चंद्रपूर) या दोघांनी प्लॉट विक्री, व्यापार, निधी योजना आदींच्या माध्यमातून अनेक नागरिकांचा विश्वास संपादन केला. प्रारंभी काही महिन्यांपर्यंत व्याज दिल्यानंतर फेब्रुवारी २०२३ पासून त्यांनी व्यवहार बंद करत नागरिकांचे पैसे थांबवले. परिणामी, अनेकांचे आयुष्य आर्थिक संकटात सापडले असून, काहीजण कर्जाच्या ओझ्यामुळे मानसिक तणावात आहेत.

सन्माननीय एम. सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, तक्रारदारांनी जे कागदपत्रे सादर केली आहेत, त्यांची पडताळणी करून लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच, पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे.

या त्वरित आणि संवेदनशील हस्तक्षेपाबद्दल नागरिकांनी मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन व डॉक्टर मंगेश गुलवाडे यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, या प्रकरणात न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.