आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जाफराबाद येथे एअरटेल टॉवर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी..

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील ग्रामपंचायत जाफराबाद हद्दीत उभारण्यात आलेल्या एअरटेल मोबाईल टॉवर व सध्या सुरू असलेल्या नवीन खांबासाठीच्या खोदकामाबाबत चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कामासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, तसेच रस्ते व सार्वजनिक जागेची हानी झाली आहे का, याची सखोल चौकशी व्हावी. जर नियमांचे उल्लंघन आढळले तर संबंधित कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणात तहसील प्रशासन, ग्रामपंचायत व संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी व गावकऱ्यांचा विश्वास कायम ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.