आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पत्नीच्या खुनातील आरोपी पतीला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा

▪️कोठारी पोलिसांच्या तपासाला यश..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

कोठारी : ( इंडिया 24 न्युज ) : संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी आजीवन कारावास (जन्मठेप) आणि ३,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश, चंद्रपूर श्री. प्रकाश कदम (DJ-1) यांनी दिनांक मे २०२६ रोजी हा महत्वपूर्ण निकाल दिला.
घटनेचा थोडक्यात तपशील:
ही घटना १२ सप्टेंबर २०२४ रोजी मौजा कुडेसावली (ता. गोंडपिपरी) येथे सकाळी ८:०० ते ८:३० च्या सुमारास घडली होती. या प्रकरणातील आरोपी धनपाल माधव रामटेके (वय ६० वर्ष) याने आपली पत्नी मृतक वंदना धनपाल रामटेके (वय ६० वर्ष) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन, चाकूने वार करून तिची हत्या केली होती. याप्रकरणी फिर्यादी अमर धनपाल रामटेके (वय ३० वर्ष) याच्या तक्रारीवरून कोठारी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
न्यायालयीन प्रक्रिया आणि निकाल:
कोठारी पोलीस स्टेशनचे सपोनी श्री योगेश खरसान यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्यादरम्यान सरकारी अभियोक्ता श्री आसिफ शेख यांनी मांडलेला युक्तिवाद, वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्षदर्शी पुरावे आणि सी.ए. (Chemical Analyzer) रिपोर्ट यांसारखे सबळ पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
शिक्षा खालीलप्रमाणे:
• कलम १०३(१) BNS (खुनाचा गुन्हा): आरोपी धनपाल रामटेके याला आजीवन सश्रम कारावास आणि ३,००० रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.
तपास पथक:
या गुन्ह्याचा तपास सपोनी श्री योगेश खरसान यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून मपोशि मनीषा गोवर्धन चिव॔डे (ब.नं. २८३३) यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.