▪️जागतिक हत्ती दिनानिमित्य कुनघाडा रै वनपरीक्षेत्राच्या वतीने मोटार सायकल रॅली..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – (इंडिया 24 न्युज ) : वनविभाग गडचिरोली वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै यांच्या वतीने जागतिक हत्ती दिनानिमित्य मोटार सायकल जनजागृती रॅली काढण्यात आली. सर्वप्रथम माल्लेर मालचे सरपंच वसंत चलाख, गिलगाव जमी येथील सरपंच रेखा अलाम, वनपरिक्षेत्र अधिकारी मधुमती तावाडे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. रॅली वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै येथून निघाली असून, रॅलीच्या माध्यमातून कुनघाडा रै , तळोधी, जोगना, येडानूर, लसनपेठ, पावीमुरांडा, रावणपल्ली, कुथेगाव, माल्लेर, नवरगाव, गिलगाव, काशिपूर आदी गावात हत्ती या वन्य प्राण्यांबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. रॅलीमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी मधुमती तावाडे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक एच जी झोडगे, क्षेत्र सहाय्यक आर पी धाईत, क्षेत्र सहाय्यक एस एस खोब्रागडे, क्षेत्र सहाय्यक मुनघाटे, वनरक्षक एच एम टेकाम, एस यू खोब्रागडे, आर एस चिचघरे, एच जी उंदीरवाडे, प्रमोद तडोसे, आर एस बगडे, एन व्हि वाडगुरे, ममता देवाडे, होमीता मडामे, वनमाला उरेते, राधा मडावी कुनघाडा रै परीक्षेत्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच वनमजूर उपस्थित होते.