आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी! महत्वाची बातमी आता एक राज्य-एक गणवेश धोरण लागू होणार..

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

मुंबई (इंडिया 24 न्यूज )राज्यात ‘एक राज्य- एक गणवेश’ हे धोरण येत्या नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून है धोरण लागू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्यभरातील सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आता चालू वर्षांपासून एकाच रंगाचा गणवेश असणार आहे. त्यात आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची पँट असा गणवेश विद्यार्थ्यांना परिधान करावा लागणार आहे.

15 जूनपासून शाळा सुरू होणार
ज्या शाळांनी या निर्णयापूर्वी कपड्यांच्या ऑर्डर दिल्या असतील, तर अशा ठिकाणी शाळांनी ठरवलेला गणवेश विद्यार्थ्यांनी 3 दिवस परिधान करावयाचा आहे आणि त्यानंतर पुढील 3 दिवस राज्य सरकारने ठरवून दिलेला गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करावयाचा आहे, असेही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले आहेत. राज्यात येत्या 15 जूनपासून शाळा सुरू होणार असून अवघे 22 दिवस शिल्लक आहेत.

सर्व सरकारी शाळांसाठी एक राज्य- एक गणवेश’चे धोरण जाहीर करण्यात आले आहे. दीपक केसरकर यांची शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत काल 23 मे बैठक झाली असता हा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं समजत आहे. दरम्यान राज्य सरकारने 2023-24 च्या अर्थसंकल्पात मोफत शालेय गणवेशासाठी निधीची तरतूद केली होती, त्यानुसार ही संकल्पना राज्य सरकारकडून राबवली जाणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.