▪️International Nurses Day निमित्त टेकडाताला येथे Florence Nightingale जयंती उत्साहात साजरी

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : टेकडाताला (ता. सिरोंचा), दि. १२ मे २०२६ प्राथमिक आरोग्य केंद्र, टेकडाताला येथे आज फ्लॉरेन्स नाइटिंगेल जयंती तसेच आंतरराष्ट्रीय नर्सेस दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिचारिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेमधील मोलाच्या योगदानाचा गौरव केला. रुग्णसेवा, आपत्कालीन सेवा, माता-बाल आरोग्य सेवा तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा प्रभावीपणे राबविण्यात नर्सेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान नर्सिंग अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. “रुग्णसेवा हीच खरी मानवसेवा” हा संदेश देत उपस्थित सर्वांनी अधिक समर्पणाने कार्य करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमास डॉ. महेश चव्हाण (वैद्यकीय अधिकारी) डॉ. बुद्धशील रामटेके (वैद्यकीय अधिकारी) श्री. दीपक चौधरी (आरोग्य सहाय्यक) कु. वत्सला मेश्राम (आरोग्य सहाय्यिका) तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


