▪️तेंडूपत्ता संकलनामुळे जप्राबाद ग्रामपंचायत परिसरात रोजगाराची सुवर्णसंधी..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील ग्रामपंचायत जप्राबाद परिसरात तेंडूपत्ता संकलनाचा हंगाम उत्साहात सुरू असून ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. जंगल परिसरात महिला, पुरुष, युवक-युवती सकाळपासून मेहनत घेत असून त्यांना चांगला मोबदला मिळत आहे.
तेंडूपत्ता संकलनामुळे ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नात भर पडली असून अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. शेतमजुरी कमी असलेल्या काळात तेंडूपत्ता हंगाम हा जप्राबाद परिसरासाठी वरदान ठरत आहे.
संकलन केंद्रावर योग्य सुविधा उपलब्ध असून कामकाज सुरळीत सुरू आहे. मजुरांना वेळेवर पैसे मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागाच्या सहकार्यामुळे संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित पार पडत आहे.
तेंडूपत्ता हंगामामुळे जप्राबाद गावातील बाजारपेठेला देखील चालना मिळाली असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत आहे. गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून हा हंगाम ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचा ठरत आहे.



