आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️पोलीस स्टेशन कोठारी हददीत ९८,१३९/- रु. चा प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त..

▪️स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ची कामगिरी..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पानमसाला याची अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरोधात चंद्रपूर पोलिसांनी आपली धडक मोहीम सुरूच ठेवली आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) राजुरा उपविभागीय पथकाने कारवाई करत कोठारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ९८,९३९/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दिनांक २०/०५/२०२६ रोजी पोलीस स्टेशन कोठारी अंतर्गत येणाऱ्या भागात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची मोठी साठवणूक करून विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने संशयिताच्या घर आणि दुकानावर अचानक छापा टाकला. या छाप्यात शासनाने प्रतिबंधित केलेला ०७ वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचा सुगंधित तंबाखू, गुटखा आणि पानमसाला एकूण किंमतः ९८,१३८ रुपये जप्त करण्यात आला.

या कारवाईदरम्यान आरोपी बंडू रामदास पहानपट्टे (वय ५३ वर्षे, रा. कोठारी, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन कोठारी येथे अप. क्र. १०४/२६ भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील सपोनि श्री बलराम झाडोकार, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोहवा अजय बागेसर, किशोर वैरागडे, पोअं गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, वृषभ बारसिंगे यांनी केली आहे.

चंद्रपूर पोलिसांचे आवाहनः जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अवैध सुगंधित तंबाखू, गुटखा किंवा अमली पदार्थांची विक्री व साठवणूक होत असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.