आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️बल्लारशाह रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, बल्लारपूर येथे स्वतंत्र रेल्वे पोलिस ठाणे करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

▪️मुख्यमंत्र्यांनी दिल्या बल्लारपूर येथे स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाणे करण्याच्या सूचना..

 

*🔸श्री. कुणाल गरगेलवार*
*🔸चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9356776439*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १२ : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकीचे स्वतंत्र पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याची मागणी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या माध्यमातून आ. मुनगंटीवार यांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा शासन दरबारी ठामपणे मांडत आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात सदस्य रेल्वे उपभोगता सल्लागार समिती ( झेडआरयुसीसी) मध्य रेल्वे मुंबईचे श्री.अजय दुबे यांनी हा विषय आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिला होता. या विषयाची गांभीर्याने दखल घेत आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन, बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकीचे स्वतंत्र पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याची लेखी विनंती सादर केली.

या निवेदनात त्यांनी नमूद केले की, बल्लारशाह हे महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवरील एक अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, येथे दररोज ३००० हून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. सध्या येथे केवळ जीआरपीची आऊट पोस्ट कार्यरत असून, तिची कार्यक्षमता अत्यंत मर्यादित आहे. या ठिकाणी जवळचे जीआरपी स्टेशन वर्धा येथे आहे. ते तब्बल १२० किमी अंतरावर आहे. वर्धा जीआरपीचे कार्यक्षेत्र राजुरा आणि यवतमाळपर्यंत पसरले असून, एकूण १९ रेल्वे स्थानके यामध्ये समाविष्ट आहेत.

रेल्वे स्टेशनवर गंभीर घटनांचे प्रमाण वाढत असताना, स्वतंत्र पोलिस स्टेशन नसल्यामुळे तपास प्रक्रिया, प्रवाशांच्या मदतीसाठीची तत्परता आणि एकूणच कायदा-सुव्यवस्था यावर परिणाम करणारी ठरत आहे. त्यामुळे स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाण्याची आवश्यकता असल्याचे आमदार श्री. मुनगंटीवार यांनी अधोरेखित केले.

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत तात्काळ स्वतंत्र जीआरपी पोलिस ठाणे करण्यासंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.