▪️सोनापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध ठराव मंजूर..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सोनापूरची ग्रामसभा सरपंच गोपिका टेकाम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून सभेत विकासाशी संबंधित अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत ग्रामपंचायतीने पुढील कामकाजासाठी काही महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर केले. गावात दारूबंदी असून सुध्दा अवैध दारूविक्री करणाऱ्यांना कोणतेही दाखले किंवा नाहरकत प्रमाणपत्र देऊ नये, सभेत पाणीपुरवठा.रस्ते दुरुस्ती स्वच्छता मोहीम, शाळेच्या सोयीसुविधा, कुपोषण, तसेच ग्रामविकास निधीचा कार्यक्षम वापर, रोहयो कामांचे नियोजन विविध विकास कामांचे नियोजन करणे.तंटामुक्ती गाव समिती गठन.पेसा मोबाईलायझर निवड करणे आदी विषयांवर विशेष भर देण्यात आले गावातील पायाभूत सुविधांच्या उभारणीबाबत ग्रामपंचायतीने ठोस भूमिका घेतली. गावकऱ्यांचा सहभाग पारदर्शक कामकाज आणि विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याच्या दृष्टीने ग्रामसभा यशस्वी ठरली असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
सभेचे वाचन ग्रामपंचायत अधिकारी निमसरकार यांनी केले यावेळी उपसरपंच शेषराव कोहळे.सदस्य सविता कुनघाडकर.दिपाली मेश्राम संदिप सोयाम. माजी उपसरपंच महादेव चलाख.रेवनाथ पिपरे देविदास कुनघाडकर घनश्याम घोंगडे अंगणवाडी सेविका महिला.तरुण.प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.