आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 21 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे 21 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत कोर्स आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे दिनांक 15 सप्टेंबर 2026 रोजी मुलाखतीस हजर रहावे. उमेदवारांसाठी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर कोर्ससाठी संबंधित परिशिष्टांची माहिती उपलब्ध करुन दिले जाईल. किंवा 9156073306 या मोबाईल नंबरवर SSB-६६ हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट व्हॉट्सॲप व्दारे पाठवले जातील. प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना घेऊन येणे आवश्यक आहे.

(अ) कम्बाईंड डिफेन्स सव्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेन्स एकॅडमी एक्झामिनेशन पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. (ब) एन.सी.सी. स्पेशल एन्ट्री साठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. (क) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. (ड) विद्यापीठ प्रवेश प्रणाली साठी एस.एस.बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी.साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांचा training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.