◼️ सिंदेवाहीत कोहळी समाजाचा विराट शक्तिप्रदर्शन मेळावा
🔶 चार जिल्ह्यातून समाज बांधवाची विक्रमी उपस्थिती; प्रथम समाज, नंतर पक्ष,'च्या भूमिकेवर सर्व संमतीची मोहोर...... 🔷"एकजूट समाजाची, ताकद समाजाची" या नाराने दुमदुमला सिंदेवाही परिसर 🔷

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही:🙂इंडिया न्युज )दि. २२ ऑगस्ट कोहळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक संघटनात्मक प्रश्नावर सखोल व व्यापक चर्चा करण्यासाठी शनिवार दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी सिंदेवाही येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य लोकप्रतिनिधी मेळाव्याला चार जिल्ह्यातून अभूतपूर्व व ऐतिहासिक प्रतिसाद लाभला. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या चारही जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने समाज बांधव, माता-भगिनी, तरुण व जेष्ठ नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाल्याने या मेळाव्याला एका महासभेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
” राजकीय पक्ष आणि विचारधारा वेगळ्या असल्या, तरी समाजाच्या सामूहिक हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन भूमिका मांडली पाहिजे आणि आपल्या न्याय मागण्यासाठी संघटितपणे ताकतीने पाठपुरावा केला पाहिजे,” असा खणखणीत संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.
🔺 पक्षभेद विसरून “प्रथम समाज नंतर पक्ष”
मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे “प्रथम समाज, नंतर पक्ष ” ही केंद्रस्थानी राहिलेली भूमिका ठरली. समाजाची संघटनीक बांधणी अधिक मजबूत करणे, युवकांसाठी शिक्षण व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे, उद्योग- वसाहतीना व व्यवसायाला प्रोत्साहन देणे, तसेच कोहळी समाजाच्या पारंपरिक विवाह पद्धती व सांस्कृतिक वारशाचे जतन करणे, यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर सविस्तर मंथन झाले. शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या समाजाच्या विविध मागण्यांवर सातत्याने आणि आक्रमक पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
🔸 आयोजकांची अपुरी पडली आसनव्यवस्था; अलोट गर्दी!
मेळाव्याला मिळालेल्या अबूतपूर्व जनसागरामुळे नियोजित सभागृहातील आसनव्यवस्था पूर्णपणे अपुरी पडली. परिस्थिती एवढी भव्य होती की, सभागृहाच्या तिन्ही बाजूंना अतिरिक्त व्यवस्था करावी लागली. चारही जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता. महिला, तरुण आणि ज्येष्ठांचा हा सक्रिय व मोठा सहभाग या मेळाव्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य ठरले.
🔹 प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक मान्यवर;
मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते हे होते. यावेळी पद्मश्री परशुराम खुणे, कोहळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे, अमोल मुंगमोडे, दिवाकर निकुरे, विनोद बोरकर, प्रा. डॉ. सौ.किरण कापगते, श्यामजी हटवादे, संजय घोनमोडे, सौ.कल्पना बोरकर, गंगाधर परशुरकर, चामेश्वर गहाणे, नाना नाकाडे, सदानंद बोरकर, कांचन गहाणे, ललित भाळबुद्धे आदीसह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
▪️ कार्यक्रमाचे यशस्वी संचालन व आभार!
कार्यक्रमाची सुरुवात रमाकांत लोधे यांच्या प्रस्ताविकाने झाली. अत्यंत शिस्तबद्ध व जोशपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्राध्यापक सुभाष बोरकर व भूपेश भाकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिवाकर डी. बोरकर यांनी मानले.
हा विराट मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी चंद्रपूर जिल्हा कोहळी पाटील संघर्ष मंच तसेच समस्त कोहळी समाज बांधवांनी विशेष परिश्रम व सहकार्य केले. या ऐतिहासिक मेळाव्याकडे विदर्भातील कोहळी समाजात एक नवी ऊर्जा आणि अभूतपूर्व सामर्थ्य निर्माण झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.


