▪️ताडाळी टि पॉईंट MIDC अवैध दारू विक्री बंद करा. : आजाद समाज पार्टी

राज जांभूळकर – मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : आज दिनांक 15/07 /2025 रोजी आजाद समाज पार्टी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तालुका अध्यक्ष आकाश चिवंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक पडोली यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली
ताडाळी, उमरी (रिठा) व ताडाळी MIDC तसेच टी-पॉईंट परिसरात दिवसेंदिवस बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात आजाद समाज पार्टीने पोलिस प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे.
ग्राम पंचायत ठराव
या विषयासंदर्भात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये यावर सविस्तर चर्चा होऊन खालील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले आहेत:
▪️ ताडाळी व MIDC परिसरातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी.
▪️ पोलिसांनी परिसरात नियमित गस्त ठेवून गुन्हेगारी प्रवृत्तीवर लक्ष ठेवावे.
▪️कोणताही पोलीस कर्मचारी दारू विक्रेत्यांशी संगनमत करत असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी.
▪️गावातील व्यक्ती दारू विक्री करताना दोषी आढळल्यास त्यांना शासकीय योजनांचा लाभ देऊ नये.
यावर आधारित निवेदन आजाद समाज पार्टीच्या वतीने मा. पोलीस निरीक्षक, पो.स्टे. पडोली यांना देण्यात आले असून, त्वरित कठोर कारवाई न झाल्यास आजाद समाज पार्टी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
अवैध दारू विक्रीमुळे परिसरात चोरी, अपघात, असामाजिक वर्तन व गुन्हेगारी वाढत चालली आहे. औद्योगिक क्षेत्र असल्याने कामगार, स्थानिक महिला, युवक यांच्यावर याचा मोठा मानसिक व सामाजिक परिणाम होत आहे.
“शासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल” – असा इशारा आजाद समाज पार्टीने दिला आहे.
निवेदन सादर करतांना तालुका अध्यक्ष आकाश चिवंडे, प्रीतीताई आवळे, प्रशांत आवळे आदी उपस्थित होते.