पार्किंग ठेकेदाराला पाठीशी घालून मालमत्ता विभाग उपायुक्तांच्या आदेशाला वाशी विभागाची केराची टोपली .

सुबोध सावंत :-मुंबई विभागीय प्रतिनिधी
नवी मुंबई – (इंडिया 24 न्यूज )वाशी येथे बेकायदेशीर पार्किंग शुल्क वसुली करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मालमत्ता विभागाचे उपायुक्त भागवत डोईफोडे यांनी वाशी विभाग अधिकारी यांना दिले आहे.
वाशी सेक्टर ३०, प्लॉट नं.३६-ए वर महापालिकेच्या एका ठेकेदाराकडून बेकायदेशीर पार्किंग शुल्क वसुली केली जात होती. याविषयी तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन उपायुक्त राहुल गेठे यांनी धाड टाकून कारवाई केली होती. तदनंतर याप्रकरणी तत्कालीन विभाग अधिकारी सागर मोरे यांना गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. या विषयी वाशी पोलीस, विभाग कार्यालय आणि उपायुक्त कार्यालय याकडे वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. त्यानंतर तक्रारदार संजय भवारी यांनी उपायुक्त भागवत डोईफोडे यांना निवेदन दिले होते. यामध्ये त्यांनी पालिकेच्या आर्थिक हानीस कारणीभूत असलेल्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी. सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार डोईफोडे यांनी विभाग अधिकारी सुखदेव येडवे यांना या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित ठेकेदारावर गुन्हा सिध्द झाल्यास न.मुं.म.पा.च्या काळ्या यादीत टाकण्याच्या कारवाईसाठी अहवाल सादर करावा, असे आदेश
दिले आहेत.