▪️मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ दुरूस्ती करा..
▪️बुर्रावार यांची नगरपंचायत मुख्याधिकारी कडे मागणी..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील सिरोंचा नगरपंचायत अंतर्गत अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवास करणे प्रवाशांना घोकादायक ठरत असून, रस्त्यावरून वाहन चालवताना धरकाप उडत आहे. विशेष म्हणजे मार्केटमधील मुख्य रस्ता पंचायत समिती सिरोंचा, ग्रामीण बैंक सिरोंचा, पोस्ट ऑफीस सिरोंचा व ग्रामीण रूग्णालय हे सर्व शासकीय कार्यालय व ग्रामीण रूग्णालयाचा मुख्य रस्ता असल्यामुळे लोकांचे नेहमीच गर्दी असते व रूग्णाचे व वयोवृध्दांचे ये-जा करीत असतात. त्यामुळे कार्यालय समोरील रस्ते भयंकर खड्डेमय झाल्यामुळे खड्यामध्ये पाणी साचून चिखल साम्राज्य निर्माण होत आहे.यामुळे संबंधीत कार्यालयात ये-जा करणारे नागरिक व तसेच ग्रामीण रूग्णालयात दररोज येणारे रूग्णांना
नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष ते मुळे विद्यार्थी व वयोवृध्द लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे पंचायत समिती समोरून ते ग्रामीण रूग्णालय पर्यंतचा व वार्ड नं.1मधील पोस्ट ऑफीस समोरून ते वेंकटेश इटक्याला यांच्या घरापर्यंत चा रस्ता आणि नाली दुरूस्ती करण्यात यावे किंवा नवीन रस्ता आणि नाली बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी रविकांत बुर्लावार यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.