ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️सुभाषग्राम येथे स्तनपान सप्ताह साजरा..

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यात डॉ प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली, डॉ विनोद म्हशाखेत्री तालुका आरोग्य अधिकारी मुलचेरा यांचे मार्गदर्शनाखाली सुभाषग्राम येथे 5 ऑगस्ट रोजी स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ.काजल बिस्वास, आरोग्य सहाय्यक बिचित्र बिस्वास, आरोग्य सेवक मंगेश वासेकर, आरोग्य सेविका शेफाली खंडाळे, कंत्राटी आरोग्य सेविका प्रतिमा दुर्गे, गटप्रवर्तक नलिनी सूत्रपवार, आशा कार्यकर्त्या माधवी बाछाड, दुर्गा मजुमदार, अंगणवाडी सेविका उमा मजुमदार, लतिका रॉय, आरती समद्दार आदी उपस्थित होते.
यावेळी स्तनदा मातांना स्तनपान करतांना मातांची स्थिती, बालकाची स्थिती, बालकाची पकड कशी असावी याविषयी माहिती देण्यात आली.