▪️गुन्हे शोध पथक पोलीस ठाणे, रामनगर पथकाने मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस केले जेरबंद..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : पोलीस ठाणे, रामनगर येथे दि. २६/०६/२०२६ रोजी फिर्यादी नामे सतिष तेजराम वाडेकर, वय-४८ वर्ष, व्यवसाय- कुशनकाम, रा. संजयनगर, दुर्गा मंदीरचे मागे, मुल रोड, चंद्रपुर याने पोस्टेला तक्रार दिली की, दि. २६/०६/२०२६ रोजी फिर्यादी यांनी त्याची वापरती एक काळया रंगाची हिरो होन्डा स्प्लेंडर मो. सा. क. एमएच ३४ एएच ५९३० जिचा चेसीस क. MBLHA10EZBHH60621 इंजिन क. HA10EFBHH51129 असा असलेली किं. ३०,०००/- रू. अशा वर्णनाच्या मोटार सायकल ने नेहरूनगर चौक चंद्रपुर येथे चिकन घेण्यासाठी आले व मोटार सायकल उभी करून चिकन घेण्यासाठी दुकानामध्ये गेले व चिकन घेवुन मोटार सायकल कडे परत आले असता ठेवलेल्या ठिकाणी मोटार सायकल दिसुन आली नाही. त्यामुळे फिर्यादीने आजुबाजुचे परीसरात व ओळखीचे लोकांकडे पाहणी व विचारपुस करून मोटार सायकलचा शोथ घेतला असता मिळून आली नाही. फिर्यादीची नमुद वर्णनाची मोटार सायकल कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरून नेली. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोस्टे रामनगर येथे अप. क. ८७०/२६ कलम ३०३ (२) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
वरीलप्रमाणे प्राप्त तक्रारीवरून पो. नि. प्रभावती एकुरके मॅडम, पोस्टे रामनगर यांचे मार्गदर्शनात गुन्हे अन्वेशन विभागात कार्यरत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे मिळून सदर गुन्हयाचे घटनास्थळी रवाना होवुन अज्ञात आरोपीचा शोध घेणे करीता घटनास्थळावर असलेल्या लोकांना तसेच आजुबाजुला विचारपुस केली. तसेच बंगाली कॅम्प, नेहरूनगर परीसरात जावुन अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना गोपनिय बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, एक ईसम मोटार सायकल विक्री करण्याचे ईराद्याने बंगाली कॅम्प, नेहरूनगर परीसरातील लोकांना मोटार सायकल खरेदीबाबत विचारणा करीत फिरत आहे. अशी माहीती प्राप्त झाल्याने आम्ही सदर ठिकाणी पो. स्टॉपसह सापळा रचुन आरोपी नामे प्रशांत राजकुमार करमनकर, वय ३१ वर्ष, धंदा-मजुरी, राह. समाधी वार्ड गोंड राजा सवारी बंगल्यासमोर चंद्रपुर ह.मु. हिंदुस्थान धाबा, गांव-धोतरा, हिंगणघाट जि. वर्धा संशयीतरित्या डब्ल्युसीएल रेती बंकर परीसरात पकडण्यात आले. त्यास पोरटे रामनगर येथील दाखल सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने प्रथमतः उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यानंतर नमुद आरोपीस विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरून सदर आरोपीस रितसर अटक करून त्यास गुन्हयातील चोरी केलेल्या मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्याने चोरी केलेली मोटार सायकल डब्ल्युसीएल रेती बंकर चंद्रपुर येथे एका ठिकाणी ठेवलेली असल्याबाबत सांगितले असता आम्ही पो. स्टॉफ, पंच असे मिळुन आरोपीसह डब्ल्युसीएल रेती बंकर चंद्रपुर येथे गेलो असता त्या ठिकाणी असलेल्या पडीत भितींच्या ओडाशाला
आरोपीने चोरी केलेले एकुन ३ मोटार सायकल १) काळया रंगाची निळा पट्टा असलेली हिरो होन्डा स्प्लेंडर मो. सा. क. एमएच ३४ एएच ५९३० जिचा चेसीस क. MBLHA10EZBHH60621, इंजिन क. HA10EFBHH51129 असा असलेली किं. ३०,००० /- रू. २) निळया रंगाची पांढरा पट्टा असलेली हिरो होन्डा स्प्लेंडर विना नंबरची जिचा चेसीस क. 03D20F03360 इंजिन क्रमांक दिसुन येत नसलेली अशा वर्णनाची किं. २०,०००/- रू. ३) काळया रंगाची निळा पट्टा असलेली हिरो होन्डा सुपर स्प्लेंडर विना नंबरची जिचा चेसीस क. 05CAAF13119 इंजिन क्रमांक दिसुन येत नसलेली अशा वर्णनाची किं. २०,०००/- रू. असे एकुन ७०,०००/- रू. चे मोटार सायकल विक्री करण्याचे इराद्याने ठेवले असल्याचे दिसुन आले. सदर मोटार सायकल पंचासमक्ष जप्त करण्यात आले.
सदर कारवाई मा. पोलिस अधिक्षक श्री. आयुष नोपानी सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले सा., मा. पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके मॅडम याचे मार्गदर्शना खाली पोलीस ठाणे रामनगर गुन्हे शोध पथकातील सपोनि शिवाजी नागवे, सपोनि हनुमान उगले, पोउपनि कृष्णा दराडे तसेच पो. हवा/११६५ आंनद खरात, पोहवा/बाबा नैताम २२५३, पोहवा / रामप्रसाद नैताम १३०६, पोहवा/शरद कुडे २२७३, पोहवा/जितेंद्र आकरे ५६६, सफौ / प्रकाश बलकी ६१८, पोहवा रवि ढेंगळे/८४७, मपोहवा मनिषा मोरे / ४६२, पोअं. प्रकाश मडावी/२७०८, पोअं. पंकज ठोंबरे/१२३०, पोअं. प्रफुल्ल पुप्पलवार/६३०, पोअ. संदीप गेडाम/१३०४, पोअं. सुरेश कोरवार/२२९१, पोअं पंकज पोंदे/७३४, मपोशि ब्ल्युटी साखरे/२६५३ यांनी केलेली आहे.



