पोलीस स्टेशन माजरी येथे CEIR Portal चे मदतीने हरविलेले मोबाईल शोधुन मूळ मालकांना केले परत..
पोलीस स्टेशन माजरी ची कामगिरी..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : सन 2025-2026 मध्ये पोलीस स्टेशन माजरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर कार्यक्षेत्रांतर्गत हरविलेल्या मोबाईल फोनची माहिती CEIR PORTAL द्वारे प्राप्त करण्यात आली. त्यानुसार चंद्रपूर (महाराष्ट्र) आणि थेट मध्यप्रदेश येथून माग काढून एकूण 07 मोबाईल फोन शोधून काढण्यात आले. हे सर्व मोबाईल फोन मूळ मालकांना पोलीस स्टेशन माजरी येथे सुरक्षितपणे परत करण्यात आले आहेत.
पोलीस स्टेशन माजरी यांच्याकडून मिळालेल्या या जलद आणि सकारात्मक प्रतिसादाबद्दल सर्व तक्रारदार मोबाईल मालकांनी पोलीसांचे मनापासून आभार मानले आहेत. तक्रारदार मोबाईल मालकांचे नाव व मोबाईल तपशीलः प्रफुल चवरे, रा. वालधर्डी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर। VIVO Y२८ MOBILE, राहुल टलांडे, रा. पळसगाव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर। VIVO Y९० MOBILE, दिपक कुमार निराला, रा. कुचना, ता. भद्रावती, । REALME RMX३९९८ MOBILE, ज्ञानचंद बहादूर, रा. माजरी कॉलरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर। VIVO T३x MOBILE, सजेंद्र खऱ्यात, रा. कुचना, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर। XIAOMI MI ११ LITE MOBILE, प्रकाश केवट, रा. माजरी कॉलरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर। REDMI MOBILE, राम शर्मा, रा. माजरी कॉलरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर। REALME RMX३२४२ MOBILE, एकूण 07 हरविलेल्या मोबाईलची प्रत्येकी किंमत अंदाजे 15,000/- रुपये प्रमाणे, एकूण अंदाजे किंमत 1,05,000/- रुपये चा मुद्देमाल संबंधीत फिर्यादींना परत करण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा श्री संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पोस्टे माजरी सपोनि श्री सुबोध वंजारी यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन माजरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे. पोलीस प्रशासनातर्फे जनतेला जाहीर आवाहनः जनतेला आवाहन करण्यात येते की, आठवडी बाजार करताना किंवा बस स्टँड सारख्या गर्दीच्या ठिकाणी जाताना-येताना स्वतःचे मोबाईल फोन शर्टच्या वरच्या खिशामध्ये ठेवू नये. अशा ठिकाणी मोबाईल हरविण्याची किंवा चोरीला जाण्याची अधिक शक्यता असते. मोबाईल हरविला किंवा चोरीला गेल्यास ताबडतोब आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी. त्वरीत त्याच क्रमाकांचा सिमकार्ड घ्यावा व त्यानंतर दुरसंचार विभागाचे CEIR या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.



