आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️तंबाखू अवैद्यरित्या कब्जात बाळगणारा रामनगर पोलीसांच्या जाळ्यात..

▪️एकूण किमतीचा ६७,७५०/रू.चा माल जप्त..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्यरित्या अंमली पदार्थ व प्रतिबंधित माल कब्जात बाळगणारे व विक्री करणारे लोकांबाबत माहिती घेऊन त्यांचेवर छापा घालण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांनी रामनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी प्रभावती एकुरके मॅडम यांना देऊन सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अशा प्रकारचे लोकांबाबत माहिती घेऊन प्रभावी कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार अवैद्यरित्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली तंबाखू बाळगणारे लोकांबाबत माहिती गोपनीय माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तोफीक करीम भिमानी, वय – ३६ वर्षे, स रा. नुरी मस्जिद जवळ, रहेमतनगर, चंद्रपूर हा त्याचे राहते घरात अवैद्यरित्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली होला, ईगल, क्रेझ ईत्यादी सुगंधीत तंबाखू कब्जात बाळगून असून तिची विक्री करत आहे. त्यानुसार पोलीस पथकाने पंचासह ईसमाचे घरावर दि. ०८/०७/२०२६ रोजी २१.२५ वा. छापा घातला असता त्याचे कब्जात ६७,७५०/- रू. किं. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली होला, ईगल, क्रेझ तंबाखू मिळून आल्याने पथकाने तो पंचासमक्ष जागीच जप्त करून त्याचेवर पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्र. ९०५/२०२६ कलम १२३,२२३,२७५ भारतीय न्याय संहिता सह कलम ३० (२) (a), २६ (२) (i), iv, ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीस गुन्ह्यात अटक केलीआहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि सचिन राखुंडे करीत आहेत.

वरील कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर काककडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद चौगुले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार ढेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे व ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.