आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव-2026 पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 9 जुलै 2026 : आगामी सार्वजनिक गणेशोत्सव-2026 च्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथील ड्रिल शेडमध्ये मा. श्री. आयुष नोपानी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व नियोजन बैठक पार पडली. यावेळी मा. श्री. अकनूरी नरेश, आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका, मा. श्री. ईश्वर कातकडे, अप्पर पोलीस अधीक्षक, मा. श्री. प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच महानगरपालिका व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या. सर्व गणेश मंडळांनी समन्वय समिती स्थापन करणे, स्वयंसेवकांची नियुक्ती करणे, सीसीटीव्ही व्यवस्था उभारणे, विसर्जन मिरवणुकीतील वाहनांवर लहान मुलांना बसवू नये, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे तसेच आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात श्री गणेश चतुर्थीपासून डीजे बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तिकार, डीजे चालक-मालक, आदींसह सुमारे 200 ते 250 नागरिक उपस्थित होते.

जिल्हा प्रशासन व चंद्रपूर जिल्हा पोलीस यांच्या वतीने गणेशोत्सवासाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात येणार असून, सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून शांततापूर्ण व सुव्यवस्थित गणेशोत्सवासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.