आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व मागासवर्गीय कल्याण योजना जाहीर

▪️ग्रामपंचायत स्तरावरील लाभार्थ्यांसाठी संधी..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 8 : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 20 टक्के मागासवर्गीय कल्याणकारी योजना, 7 टक्के वन महसूल व 5 टक्के दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत विविध वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजना राबविण्यात येणार आहेत.

या योजनांचा मुख्य उद्देश ग्रामपंचायत स्तरावरील दिव्यांग व्यक्ती आणि मागासवर्गीय नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणणे आहे. पात्र लाभार्थ्यांनी संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमध्ये 27 जुलै 2026 पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे.

योजनांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना आवश्यक साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य (डिबीटीमार्फत) आणि मागासवर्गीय कुटुंबांना स्वयंरोजगार व अन्य कल्याणकारी बाबींसाठी लाभ मिळू शकेल.

अशा आहेत 20 टक्के मागासवर्गीय कल्याणकारी योजना : 1) मागासवर्गीय अल्पभुधारक शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर ताडपत्री पुरविणे, 2) मागासवर्गीय अल्पभुधारक शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर सबमर्शिबल विद्युतपंप पुरवठा करणे, 3) ग्रामीण भागातील मागासवर्गीय अल्पभुधारक शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर ऑईल इंजीन पुरवठा करणे, 4) मागासवर्गीय महिलांना 90 टक्के अनुदानावर शिलाई मशिन / पिकोफॉल मशिन पुरविणे, 5) मागासवगीय महिलांना 90 टक्के अनुदानावर आटा चक्की पुरविणे, 6) मागासवर्गीयांना लघु उद्योगासाठी अर्थसहाय्य (ई-रिक्षा, झेरॉक्स मशिन, इलेक्ट्रिक मोटर शॉप ऑन व्हील इ.) 75 टक्के अनुदानावर, 7) मागासवर्गीय महिलांना व्यवसायाकरिता 90 टक्के अनुदानावर सोलर आयरन युनिट पुरविणे, 8) मागासवर्गीय महिलांना व्यवसायाकरिता 90 टक्के अनुदानावर सोलर व्हेजिटेबल शॉप पुरविणे.

5 टक्के दिव्यांग कल्याण योजना : 1) दिव्यांगाना साहित्य पुरविणे उदा. बॅटरी वरील स्वयंचलीत तीन चाकी सायकल, पांढरी काठी, श्रवणयंत्र, कमोड चेअर, कमोड स्टुल, सीपी चेअर इ. (वैयक्तिक). 2) दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (पिठ गिरणीकरीता 55 हजार रुपये, शिलाई मशिन 7700 रुपये, झेरॉक्स मशिन करीता 70 हजार रुपये, संगणक व प्रिंटर 58 हजार रुपये), 3) दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणे, (शेळीपालन करीता 42 हजार रुपये, कुक्कुटपालन करीता 6 हजार रुपये, दुग्धव्यवसाय करीता 43 हजार रुपये), स्वयंरोजगारार्थ दिव्यांगांना ई-रिक्क्षा/ट्राली पुरविणे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.