आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सिरोंचा तालुक्यात CPI कडून श्रमदान, चिखलमय मुख्य रस्ता वाहनांसाठी खुला..

 

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ

सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील ग्रामपंचायत जप्राबाद येथील वार्ड क्रमांक २ मधील मुख्य रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे चिखलमय होऊन पायदळ व वाहनांसाठी धोकादायक बनला होता. हा रस्ता गावातील शासकीय रुग्णालय, बाजारपेठ, अंगणवाडी, हनुमान मंदिर, शाळा तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जाणारा प्रमुख मार्ग असल्याने नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही तात्काळ उपाययोजना करण्यात आली नव्हती.

या पार्श्वभूमीवर CPI चे सिरोंचा तालुका सचिव कॉ. रवि बारसागंडी
यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून ब्लेड ट्रॅक्टरच्या सहाय्याने रस्त्यावर साचलेला चिखल व माती काढून रस्ता समतल केला. या श्रमदानामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आता पायदळ, दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत कॉ. रवि बारसागंडी यांचे आभार मानले. तसेच गावातील या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य रस्त्याचे कायमस्वरूपी काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करून भविष्यात अशी समस्या उद्भवू नये, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, CPI च्या वतीने सांगण्यात आले की, ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था ही गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. अन्यथा नागरिकांच्या प्रश्नांसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.