ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महाराष्ट्र शासनाच्या रेखाकला ड्राँईंग ग्रेड परिक्षा ४ ते ७ आँक्टोंबरला आँनलाईन आवेदनपत्रे १७ जुलैपासून भरण्यास प्रारंभ या परिक्षेपासून कोणीही वंचीत राहू नये..

 

मुख्य संपादक – श्री तुळशीराम जांभूळकर

राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने कला संचालनालयामार्फत शासकीय रेखाकला एलिमँटरी व इंटरमिजिएट ड्राँईंग ग्रेड परीक्षा ४ते ७ आँक्टोंबर २०२३ दरम्यान घेण्यात येणार आहे. कला संचालनालय,मुंबई चे संचालकांनी परिक्षेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. रेखाकला परीक्षेची आँनलाईन आवेदनपत्रे १७ जुलै पासून ते २१ आँगष्ट २०२३ पर्यंत शाळांनी भरून पाठवात्रची आहेत. एलिमेंटरी परिक्षा ४ ते ५ आँक्टोंबरला तर इंटरमिजिएट परीक्षा ६ ते ७ आँक्टोंबर रोजी होणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी एलिमँटरीसाठी सर्व खर्चासह ८० रूपये व इंटरमिजिएट १३० रूपये प्रवेश परीक्षा शुल्क आहे.
इयत्ता ७ वी ते पुढील कोणत्याही वर्गातील विद्यार्थी या परीक्षेत सहभागी होऊ शकतात. तसेच शाळाबाह्य विद्यार्थ्यांला खाजगी रीत्या सुध्दा बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तत्पूर्वी नियोजित केल्या गेलेल्या अधिकृत सेंटरवर जावूनच शहानिशा करावी. रेखाकला परीक्षा केंद्रप्रमुखांनी तसेच संबंधीत शिक्षण विभागातील जिल्हा परिषद शांळामधील शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सुध्दा या परिक्षेत बसण्यासाठी प्रवृत्त करावे जेणेकरून या महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या रेखाकला परिक्षेपासून कोणताही विद्यार्थी वंचीत राहू नये असे आवाहन आदिवासी कलासंवर्धन समितीचे जिल्हाध्यक्ष कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी पत्रकान्वये केला आहे.
या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही दिवसच कलासंचालनालयाची वेबसाईट खुली असते. त्यातून सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्यावी लागतात. यासाठी पालकांना खर्च करावा लागतो. दुर्गम व आदिवासी डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना या सोयी मिळू शकत नाहीत. त्यामुळे सर्टिफिकेट मिळाली नसल्यामुळे अन्य ठिकाणच्या उच्चकला शिक्षणात व इतर प्रवेश प्रक्रियेत अडचणी येतात तसेच हा कागदपण एकदम हलक्या दर्जाचा असल्याने त्यामुळे छापिलच सर्टीफिकेट मिळणे गरजेचे आहे. यासाठी परमानंद तिराणिक जिल्हाअध्यक्ष आदिवासी कला संवर्धन समिती यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.