आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

काळरात्र या कवितेच्या कवीयत्री निशा काळेना प्रथम पारितोषिक..

सुबोध सावंत -मुंबई विभागीय प्रतिनिधी

ऐरोली:(इंडिया 24 न्यूज )अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, ऐरोली शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या काव्यलेखन स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते.या काव्य स्पर्धेला राज्यातून चारसे पेक्षा जास्त कवींनी सहभाग नोंदविला.या मध्ये काळरात्र या कवितेच्या निर्मात्या निशा काळे यांनी प्रथम पारितोषिक मोहर उमटवली.द्वितीय मानसी वैंशपायन तर तृतीय पारितोषिक स्वप्नाली देशपांडे यांच्या कवितेला पारितोषिक मिळाले.

रविवारी ऐरोली सेक्टर १९ येथील रेड मॅजिक सभागृहात पारितोषिक वितरणाचे आयोजन करण्यात आले होतें कार्यक्रमाच्या सुरुवातीला, दिवंगत अभिनेते रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते नटराज पूजन,व राज्यगीत सादर होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली,प्रास्तविक भाषणातून नाटय परिषदेचे सचिव संदीप जंगम यांनी मागील सर्व नाट्यविषयक चळवळ ,विविध उपक्रमांचा आढावा,व आताच्या काव्य लेखन स्पर्धेचे उद्दिष्ट स्पष्ट केले,नंतर लगेचच महाराष्ट्रात गाजत असलेला कविता डॉट कॉम . कार्यक्रम अंतर्गत निमंत्रित कवी,, सूत्रधार रविंद्र पाटील,जितेंद्र लाड,वैभव वर्हाडी,रुद्राक्ष पातारे,कवीश्वर गोपाळे,प्रसाद माळी, कल्पना देशमुख, अंकिता गोळे ,व सूत्रसंचालक कवी नारायण लांडगे यांनी एकापेक्षा एक बहारदार कविता सादर करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

नंतर काव्यलेखन स्पर्धेचे परीक्षक ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे , कवी निवेदक महेंद्र कोंडे दोघांनी मुंबई,नवी मुंबई,ठाणे रायगड जिल्ह्यासह,बीड,उस्मानाबाद,चंद्रपूर,सांगली,सातारा,पुणे,नाशिक,औरंगाबाद आदी जिल्ह्यातून आलेल्या,तब्बल ४५० हुन अधिक आलेल्या कवितांचे परीक्षण केले.या प्रवेशिकांमधून,प्रथम तीन क्रमांक,व पाच उत्तेजनार्थ स्पर्धकांची निवड केली..या प्रसंगी परीक्षक कवी अरुण म्हात्रे यांनी नवोदित कवींना मार्मिक मार्गदर्शन करून,प्रथम तीन क्रमांकाच्या कवितांचे वाचन देखील केले..

या कविता लेखन स्पर्धा २०२३ चा अंतिम निकालामध्ये
प्रथम पारितोषिक निशा काळे यांच्या (कविता-काळरात्र या कवितेला मिळाले.तसेच रोख १५०० रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले.द्वितीय पारितोषिक
मानसी वैशंपायन यांच्या परतुनी जाणे या कवितेला मिळाले व रोख रु.१०००रोख व प्रमाणपत्र तसेच तृतिय पारितोषिक स्वप्नाली देशपांडे यांच्या त्याची कविता,माझी कविता या कवितेला मिळाले व रोख- रु.५०० व प्रमाणपत्र मिळाले. ५ उत्तेजनार्थ पारितोषिक मध्ये या मध्ये मुरबाड येथील जयराम कराळे यांच्या बायको या कवितेला,अंजली राणे(कोठे माणूस जपती नाते), रामराजे निंबाळकर (काय झालं तुला),संतोष गाढवे (रानभैरी), रविंद्र कांगणे (सय मेघावी उमाळा) यांना पारितोषिके मिळाली.

यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अमर गायकवाड यांनी केले..तर मुख्य आयोजक अध्यक्ष विजय चौगुले ,तसेच सर्व सहभागी स्पर्धक, स्पर्धेचे परीक्षक, कविता डॉट कॉम टीम,व उपस्थित मान्यवर रवी वाडकर,सुलेखनकार विलास समेळ,सुहास डांगळे, दत्ता नाईकरे व श्रोते,तसेच कार्यक्रम यशस्वी करणारे,शनी आवटे,संकेत खळे, प्रवीण चौगुले ,मोहन,हिंदळेकर , हेमा दळवी,यां सर्वांचे,, नाट्यपरिषद कार्यकारीणी सदस्य श्री रविंद्र औटी यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.