▪️गरीबांना रोजगाराच्या नावाखाली फसवणुक करून महानगरपालिका चंद्रपूर चा कर्मचारी जितेंद्र सारसर यानी केली लाखो-करोडो रूपयांची लुट..
▪️लोक जनशक्ती पार्टीचा चंद्रपूर जिल्हा चे जिल्हाध्यक्ष- मनोज वसंत ठेंगणे (माजी सैनिक) यांच्या लढ्या मुळे मिळाला गरिबांना मिळाला न्याय..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : महानगरपालिका चंद्रपूर येथील कर्मचारी जितेंद्र मिठ्ठुलाल सारसर यांनी मागील काही वर्षांत महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चंद्रपूर शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक गरीब महिला व नागरिकांकडून पैसे घेतल्याच्या गंभीर तक्रारी समोर आली आहे. पण गरीब गरजू लोकांना जेव्हा समोर जॉब लागला नाही तेव्हा त्यांनी जितेंद्र सारसरला पैसे परत मागितल्यानंतर त्याच्या कडून “तुम्हाला जे करायचे ते करा, माझे कोणीही काही बिघडवू शकत नाही” अशा प्रकारची उद्धट उत्तरे दिल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणात मंगला संबा वानखेडे आणि तिचा नवरा संभा वानखेडे यांचाही सहभाग असल्याची तक्रार करण्यात आली आहे. जेव्हा पीडित लोकांना कुठेच न्याय मिळत नव्हता तेव्हा त्यांनी श्री.मनोज वसंत ठेंगणे (माजी सैनिक) जिल्हाध्यक्ष,लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) , चंद्रपूर जिल्हा,यांच्याकडे तक्रार निवेदन दिले असता 20 मे 2026 पासून संबंधित विषयाला घेऊन महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे श्री.मनोज ठेंगणे यांनी पत्र व्यवहार केला आणि नंतर एस पी साहेबांना भेट देऊन संबंधितावर कार्यवाही करून पीडित गरिबांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली असता एस पी साहेबांनी त्वरित आदेश दिले व त्यामुळे जितेंद्र सर तसेच मंगला वानखेडे यांना 20 ऑगस्ट 2026 रोजी अटक करून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 318(4),319(2),351(2),3(5)या कलमा अंतर्गत त्यांच्यावर कार्यवाही सुरू आहे. या प्रकरणात लोक जनशक्ती पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री .मनोज वसंत ठेंगणे (माजी सैनिक), श्री.निलेश हिवराळे यांनी तक्रारदार महिलांना पुढे येण्यासाठी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी मदत व मार्गदर्शन केले. तसेच पूर्व विदर्भ प्रभारी ऍड. वामशीकृष्णा अरिकिल्ला यांनी संपूर्ण प्रकरणाध्ये पक्षा कडून पीडित नागरिकांना आवश्यक ते सहकार्य आणि समर्थन दिले. तसेच पक्षाचे कार्यकर्तेही सिकंदर यादव,दिनेश इंगळे, सुमित ढोले, राहुल वानखेडे,आकाश रायपुरे,विश्वास तक्कला यांचाही प्रामुख्याने समावेश आहे. या प्रकरणाच्या निराकरणासाठी बल्लारपूरचे आमदार व माजी मंत्री मा.आ.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनीही आवश्यक सहकार्य करून हे प्रकरण मार्गी लावण्यासाठी मदत केली.
गरीब आणि गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असतील, तर अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण मिळता कामा नये. संबंधित सर्व तक्रारींची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे आणि तक्रारदारांचे पैसे कायदेशीर प्रक्रियेतून परत मिळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलली पाहिजेत.या प्रकरणात जोपर्यंत या गरीब व पीडित नागरिकांना न्याय मिळत नाही आणि त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी योग्य प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही निरंतर लढा देत राहू असे श्री मनोज वसंत ठेंगणे (माजी सैनिक) जिल्हाध्यक्ष लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), चंद्रपूर जिल्हा यांनी ठामपणे सांगितले आहे.



