▪️कस्तुरबा मार्गावरील स्टेट बँक – छोटी मस्जिद चौकात स्पिड ब्रेकरचे निर्माण करण्याची..
▪️नाल्यावर सिमेंट काॅंक्रीट चे झाकण लावण्याची मनपाकडे चंद्रपूरकरांची मागणी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : कस्तुरबा मार्गावरील भानापेठ बाजार वार्डाला जोडणारा चौक म्हणजे स्टेट बँक, छोटी मस्जिद व जुनी श्रीकृष्ण टाॅकीज या चौकात शासकीय कार्यालयीन वेळेत शहरवासियांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते सोबतच शहरात वन-वे वाहतुकीचा नियम असल्याने जटपुरा गेट परिसरातून वाहन घेऊन निघालेला दुचाकीस्वार नागरीक, ॲटोचालक व चारचाकी वाहने गिरणार चौक, गांधी चौक कडे जाणारी वाहने भरधाव वेगाने येत असल्याने सिटी हायस्कूल जवळील उपरोक्त नमुद केलेल्या चौकात नेहमीच किरकोळ अपघात होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर परीसरात असलेल्या दुकानदार बांधवांकडे याबाबत अधिक चौकशी केली असता दुकानदार बंधूंनी दुजोरा देत अपघात हे नित्याचेच असल्याचा आपला अनूभव सांगुन या चौकात चंद्रपूर शहर महानगर पालिकेने त्वरित स्पिड ब्रेकरचे निर्माण करावे अशी जोरदार एकमुखी मागणी केली. सोबतच छोटी मस्जिद काॅम्पलेक्स ला लागुन असलेल्या फुटपाथवर अजिज पान सेंटर समोर सार्वजनिक सांडपाणी वाहून नेणा-या नाल्यावर मोठे भगदाड पडल्याने याठिकाणी केव्हाही अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा यावर त्वरित सिमेंट काॅंक्रेट चे झाकण टाकुन जिवघेणे भगदाड त्वरित बंद करण्यात यावे. अशी आवश्यक मागणीही यावेळी परीसरातील नागरीकांकडुन यावेळी करण्यात आली.



