आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️निर्भिड लेखणीचा दणका; सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात अखेर ” मोफत शवविच्छेदन” चा स्पष्ट फलक झळकल्याने नागरिकामधून समाधान

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही 🙂 इंडिया २४ न्युज )
ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी तालुक्यातील ‘ग्रामीण रुग्णालय’, सिंदेवाही हा एकमेव मोठा आधार आहे. शासकीय रुग्णालयात जिवंत व्यक्तीवर मोफत उपचाराची सोय असली, तरी दुर्दैवाने अपघात, आत्महत्या किंवा आजाराने मृत्यू झाल्यास मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी मृताच्या नातेवाईकांकडून उघडपणे पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता. या गंभीर समस्येची सखल घेत “दैनिक वादळ वार्ता” चे प्रतिनिधी सुनील गेडाम यांनी आपल्या निर्भीड लेखणीच्या माध्यमातून प्रशासनाला थेट जाब विचारला. या दणकेबाज वृत्तसंकलनमुळे अखेर प्रशासनाला जाग आली असून, रुग्णालयात “मोफत शवविच्छेदन ” चा फलक लावण्यात आला आहे.

▪️अज्ञानाचा घेतला जात होता गैरफायदा

शवविच्छेदन मोफत असते की त्याचे पैसे द्यावे लागतात, याची साधी माहितीही सर्वसामान्य नागरिकांना नव्हती आणि याच अज्ञानाचा फायदा घेतला जात होता. मात्र, पत्रकार सुनील गेडाम यांच्या जागरूक व दणकेबाज वृत्ताची दखल थेट जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागली. या बातमीमुळे तालुका ते जिल्हा आरोग्य प्रशासनात एकच खळबळ उडाली असून अधिकाऱ्यांना तात्काळ जाग आली.

▪️ शवविच्छेदन कक्षाबाहेर फलक लावल्याने नागरिकांना दिलासा

वृत्ताचा दणका बसताच सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाबाहेर “शवविच्छेदनासाठी कुठले शुल्क लागत नाही” असा स्पष्ट फलक प्रशासनाला लावावा लागला. यामुळे आता मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी एकाही रुपयाची लाच किंवा अवजमी पैसे द्यावे लागणार नाहीत

▪️जनहितार्थ पत्रकारितेचे सर्वत्र कौतुक

आजच्या काळात जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बाजूला सारून निष्फळ बातम्यावर भर दिला जातो, तिथे दैनिक वादळ वार्ता आणि पत्रकार सुनील गेडाम यांनी दाखवलेला हा धडाका कौतुकास्पद ठरला आहे. एका खऱ्या पत्रकारितेच्या निर्भीड लेखणीने गरीबांना न्याय मिळवून दिल्यामुळे संपूर्ण सिंदेवाही तालुक्यातून त्यांचे जोरदार स्वागत व कौतुक होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.