▪️‘छात्रों की गूंज’ अंतर्गत भव्य महा मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य महा मॅरेथॉन स्पर्धेसह विविध उपक्रमांच्या नियोजनासंदर्भात महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आरोग्य, फिटनेस आणि सामाजिक एकतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धेचे नियोजन, मार्ग, सहभागींची नोंदणी, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच स्वयंसेवकांची नियुक्ती याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थी, युवक, महिला तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. स्पर्धा शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
या महा मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीस माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सौं. कुसुमताई अलाम, प्रभाकर वासेकर, नगरसेवक सतीश विधाते, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, तालुकाध्यक्ष गडचिरोली वसंत राऊत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, देसाईगंज तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे, पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, जिल्हा उपाध्यक्ष नेताजी गावतुरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सलोटकर, जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस माधव गावड, पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर,दिवाकर निसार, जिल्हाध्यक्ष शिक्षक विभाग दत्तात्रय खरवडे, उत्तम ठाकरे, विजय लाड, नदीम नाथानी,हरबाजी मोरे, राजेंद्र ब्राह्मणवाडे, ढीवरू मेश्राम, योगेंद्र झंजाड, रवी मेश्राम, कुणाल आभारे, देवेंद्र बांबोडे, विजय शेंडे, सुधीर बांबोळे, लक्ष्मण मेश्राम, संदीप भोयर, गजानन नैताम, रामचंद्र भांडेकर, दामोदर साखरे, अरुण मेश्राम, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, जावेद खान, सौं.कविता उराडे, सौं.शालिनी पेंदाम, सौं.रीता गोवर्धन सह काँग्रेस पदाधिकारी व पत्रकार बंधू उपस्थित होते.



